Homeमहाबळेश्वरPanchgani news : महाबळेश्वर पंचायत समितीच्या मासिक सभेत विकासकामांचा धडाका; प्रलंबित कामे...

Panchgani news : महाबळेश्वर पंचायत समितीच्या मासिक सभेत विकासकामांचा धडाका; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे प्रशासनाचे निर्देश

पांचगणी न्यूज नेटवर्क

महाबळेश्वर : पंचायत समिती महाबळेश्वरची मासिक सर्वसाधारण सभा आज कै. एम. आर. भिलारे सभागृहात सभापती सौ. शकुंतला रमेश चोरमले यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत खेळीमेळीच्या आणि सकारात्मक वातावरणात पार पडली. या सभेमध्ये तालुक्यातील विकासकामे, जलजीवन मिशन, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचा निर्धार करण्यात आला.

सभेचे मुख्य आकर्षण म्हणजे मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांचे मार्गदर्शन. त्यांनी पंचायत समितीला प्राप्त झालेल्या १ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीचा विनियोग नियमानुसार आणि वेळेत करण्याच्या सूचना दिल्या. वित्तीय शिस्त पाळण्यासाठी ‘व्हीपीडीई’ (VPDE) प्रणालीचा वापर, जीएसटी आणि आयकर विषयक कामात अचूकता ठेवण्याचे निर्देश त्यांनी सर्व विभागांना दिले.

तालुक्यात सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याचे स्पष्ट केले. जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या गावनिहाय कामांचा आढावा घेऊन, सर्व नागरिकांना शुद्ध पाणी मिळेल याची खात्री करण्यात आली. तसेच बांधकाम विभागाने जनसुविधा आणि यात्रास्थळांच्या कामांची माहिती दिली. कामे लांबणीवर टाकणाऱ्या कंत्राटदारांवर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.

आरोग्य विभागाने तालुक्यातील औषध साठ्याची माहिती दिली. विशेषतः सर्पदंश आणि श्वानदंश प्रतिबंधक लसींचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. शिक्षण विभागाने शाळा दुरुस्ती, रिक्त पदे आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थिती भत्त्यावर लक्ष केंद्रित केले आहे. कृषी विभागाने बियाणे व खत पुरवठा योजना गावागावात पोहोचवण्याच्या सूचना दिल्या, तर पशुसंवर्धन विभागाने चारा टंचाईवर मात करण्यासाठी योग्य नियोजनाची गरज व्यक्त केली.

सभेच्या शेवटी गट विकास अधिकारी विजय विभुते यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना लोकप्रतिनिधींच्या सूचनांचे पालन करून विहित मुदतीत कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती विकास योजनेतील कामांच्या निविदा प्रक्रियेवरही यावेळी चर्चा झाली.

​या सभेला उपसभापती संजय मोरे, पंचायत समिती सदस्य संजय विठ्ठल शेलार, वंदना प्रवीण भिलारे, जिल्हा परिषद सदस्य संजय केळगणे, अजित संकपाळ आणि विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. आभार प्रदर्शनानंतर सभेची सांगता झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : भिलारच्या शिरपेचात मानाचा तुरा; जोगेश्वरी मातेच्या भव्य नामफलकाचे उत्साहात अनावरण

पाचगणी न्यूज नेटवर्क  भिलार : पुस्तकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिलार येथील जुने गावठाण भागात श्री सोनारसिद्धी आणि जोगेश्वरी मातेच्या वार्षिक यात्रेचे औचित्य साधून, मंदिराच्या...

Panchgani news : महाबळेश्वर वनविभागाची मोठी कारवाई; थरारक पाठलाग करून ‘खैर’ तस्करी रोखली, तिघांना...

​पांचगणी न्यूज नेटवर्क महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील महाड-पोलादपूर चेक नाक्यावर वनविभागाने धाडसी कारवाई करत बेकायदेशीर खैर लाकडाची तस्करी उघडकीस आणली आहे. वनरक्षक शालिनी कोहळे यांनी...

Panchgani news : जावली तालुक्यात निसर्गाचा कोप: शाळेची भिंत अंगावर पडून ओझरे येथील वृद्धेचा...

पांचगणी न्यूज नेटवर्क मेढा :  निसर्गाच्या लहरीपणाचा फटका जावली तालुक्याला बसला असून, बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने एका कुटुंबाचा आधार हिरावला आहे. ओझरे (ता....

Panchgani news : पांगारीच्या सुकन्या मंदा पांगारे यांचा ‘प्रगतिशील महिला शेतकरी’ पुरस्काराने गौरव! ​जिल्हाधिकारी...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पांचगणी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यानिमित्त जलसंपदा विभाग व सातारा सिंचन मंडळाच्या वतीने आयोजित कार्यशाळेत महाबळेश्वर तालुक्यातील पांगारी येथील...

Panchgani news : पाचगणीत हिंदुत्वाचा हुंकार! २६ तारखेला ‘सकल हिंदू समाजा’चे भव्य विराट संमेलन

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: येथील सांस्कृतिक आणि सामाजिक पटलावर एक ऐतिहासिक सोहळा आकाराला येत असून, हिंदू एकता, संस्कृती संवर्धन आणि सामाजिक नैतिकतेचा जागर करण्यासाठी...

error: Content is protected !!