HomeपांचगणीPanchgani news : पाचगणीत हिंदुत्वाचा हुंकार! २६ तारखेला ‘सकल हिंदू समाजा’चे भव्य...

Panchgani news : पाचगणीत हिंदुत्वाचा हुंकार! २६ तारखेला ‘सकल हिंदू समाजा’चे भव्य विराट संमेलन

पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी: येथील सांस्कृतिक आणि सामाजिक पटलावर एक ऐतिहासिक सोहळा आकाराला येत असून, हिंदू एकता, संस्कृती संवर्धन आणि सामाजिक नैतिकतेचा जागर करण्यासाठी पाचगणी शहरात ‘सकल हिंदू समाजा’च्या वतीने भव्य विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शनिवारी, २६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता पाचगणीतील ऐतिहासिक कै. देवजी बापू स्टेडियम (होळीची पट्टी, गावठाण) येथे हे संमेलन पार पडणार आहे.

बदलत्या सामाजिक परिस्थितीत हिंदू समाजातील विविध घटकांना एका सूत्रात गुंफणे, त्यांच्यात ऐक्याची भावना अधिक दृढ करणे आणि आपल्या देदीप्यमान पारंपरिक संस्कृतीचे जतन करणे हा या संमेलनाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. केवळ विचारांची देवाणघेवाणच नव्हे, तर येणाऱ्या पिढीमध्ये आपल्या महान वारशाबद्दल स्वाभिमान जागृत व्हावा, या उद्देशाने या विराट सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या संमेलनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात होणारे मान्यवरांचे प्रबोधनपर मार्गदर्शन. सामाजिक विषयांवरील परखड भाषणे, राष्ट्रभक्तीने प्रेरित विचार आणि युवकांपासून ते महिलांपर्यंत सर्वांना दिशा देणारे प्रेरणादायी सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. सध्याच्या काळात सामाजिक नैतिकतेचे जतन कसे करावे आणि संघटित शक्तीचे महत्त्व काय, यावर या व्यासपीठावरून मंथन होणार आहे.

या संमेलनाच्या निमित्ताने पाचगणी शहर आणि परिसरात सध्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आयोजकांकडून संमेलनाची तयारी युद्धपातळीवर सुरू असून, कै. देवजी बापू स्टेडियम सज्ज होत आहे. परिसरातील प्रत्येक घरातील नागरिक या सोहळ्याचा भाग होण्यासाठी उत्सुक आहेत.
“हे संमेलन केवळ एक कार्यक्रम नसून ती काळाची गरज आहे. आपली संस्कृती आणि एकतेसाठी प्रत्येकाने या विराट शक्तीप्रदर्शनात सहभागी व्हावे,” असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. या अभूतपूर्व सोहळ्याला पाचगणीसह तालुक्यातील समस्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हिंदू संस्कृतीचा हा जागर यशस्वी करावा, असे विनंती पत्रकात नमूद केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : जावली तालुक्यात निसर्गाचा कोप: शाळेची भिंत अंगावर पडून ओझरे येथील वृद्धेचा...

पांचगणी न्यूज नेटवर्क मेढा :  निसर्गाच्या लहरीपणाचा फटका जावली तालुक्याला बसला असून, बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने एका कुटुंबाचा आधार हिरावला आहे. ओझरे (ता....

Panchgani news : पांगारीच्या सुकन्या मंदा पांगारे यांचा ‘प्रगतिशील महिला शेतकरी’ पुरस्काराने गौरव! ​जिल्हाधिकारी...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पांचगणी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यानिमित्त जलसंपदा विभाग व सातारा सिंचन मंडळाच्या वतीने आयोजित कार्यशाळेत महाबळेश्वर तालुक्यातील पांगारी येथील...

Panchgani news : जनता बँकेच्या प्रतापगंजपेठ शाखेचा १७ वर्षांचा यशस्वी प्रवास; विश्वासाच्या बळावर...

पांचगणी न्यूज नेटवर्क आनेवाडी : आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि 'ग्राहकाभिमुख सेवा' या चतुःसूत्रीचा अंगीकार करत जनता अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. वाईच्या प्रतापगंजपेठ (सातारा) शाखेने...

Panchgani news : उद्याचा सुसंस्कृत नागरिक घडवण्यासाठी महाबळेश्वरच्या तापोळा परिसरात ‘बाल सुसंस्कार शिबिरा’चे आयोजन

पांचगणी न्यूज नेटवर्क पांचगणी : सध्याच्या धावपळीच्या युगात भौतिक सुखांची जुळवाजुळव करताना मानवी जीवन अस्थिर आणि तणावपूर्ण होत चालले आहे. आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण...

Panchgani news : शिवजयंतीचे औचित्य साधून गोडवलीत ‘सुभेदार’ शिष्यवृत्तीचा झंझावात; विद्यार्थिनीला लॅपटॉप आणि ग्रंथराज...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पांचगणी : किल्ले प्रतापगडाच्या छायेत वसलेल्या गोडवली (ता. महाबळेश्वर) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती केवळ पारंपरिक पद्धतीने साजरी न करता,...

error: Content is protected !!