Homeमहाबळेश्वरPanchgani news : क्षेत्र महाबळेश्वरच्या विकासासाठी राष्ट्रवादी सदैव कटीबद्ध; तांदूळनही-लामणवस्ती परिसरातील दीड...

Panchgani news : क्षेत्र महाबळेश्वरच्या विकासासाठी राष्ट्रवादी सदैव कटीबद्ध; तांदूळनही-लामणवस्ती परिसरातील दीड कोटींच्या रस्ता कामाचा खासदार नितीन काका पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

पाचगणी न्यूज नेटवर्क 

क्षेत्र महाबळेश्वर : शहरातील तांदूळनही आणि लामणवस्ती परिसरातील नागरिकांची गेल्या अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली असून, या भागातील रस्ते विकासाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे. ग्रामपंचायत श्रीक्षेत्र महाबळेश्वरच्या वतीने आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात खासदार मा. नितीन काका पाटील यांच्या हस्ते सुमारे दीड कोटी रुपये खर्चाच्या रस्ता काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन गुरुवारी अत्यंत उत्साहात पार पडले. याप्रसंगी बोलताना खासदार पाटील यांनी स्पष्ट केले की, क्षेत्र महाबळेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुती सरकार निधीची कमतरता भासू देणार नाही.

​पावसाळ्यातील चिखल आणि वाहतुकीच्या अडथळ्यांमुळे स्थानिक नागरिकांना व पर्यटकांना होणारा त्रास आता कायमचा दूर होणार आहे. या भव्य विकासकामासोबतच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ‘कुटुंब पातळीवरील समृद्ध ग्रामस्पर्धा २०२६’ चाही दिमाखदार प्रारंभ करण्यात आला. तसेच, ग्रामपंचायत व हिलदारी संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

​या विशेष प्रसंगी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, माजी सभापती संजुबाबा गायकवाड, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रविणशेठ भिलारे, गट विकास अधिकारी विजय विभुते आणि बांधकाम विभागाचे उपअभियंता अजय देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. हा सोहळा केवळ विकासकामांचा शुभारंभ न ठरता एक सामाजिक उत्सव बनला, कारण याच दिवशी श्रीक्षेत्र महाबळेश्वरचे सरपंच सुनील सुरेश बिरामणे यांचा वाढदिवसही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. खासदार नितीन काका पाटील यांनी सरपंचांच्या कार्यकुशलतेचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

​कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक प्रशांत रणपिसे यांनी केले, तर सूत्रसंचालन गणेश शेडगे व शिक्षक हजारे यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या शेवटी सरपंच सुनील बिरामणे यांनी सर्वांचे आभार मानले. एकाच वेळी रस्ता काँक्रीटीकरण, समृद्ध ग्राम अभियान आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचा मेळ साधत ग्रामपंचायतीने विकासाचा नवा वस्तुपाठ मांडल्याबद्दल संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ;...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'तुमच्या घराचा...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

error: Content is protected !!