HomeपांचगणीPanchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 'बालविवाहा'चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये!

पांचगणी न्यूज नेटवर्क 

​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले ‘बालविवाह’ उरकून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब गांभीर्याने घेत महाबळेश्वरचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी श्री. सचिन म्हस्के यांनी बालविवाह रोखण्यासाठी कंबर कसली असून संपूर्ण तालुक्यात विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत.

तहसीलदार सचिन म्हस्के यांनी दिलेल्या माहितीनुसार “तालुक्यात एकही बालविवाह होणार नाही, हे आमचे ध्येय असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही,” असा थेट इशाराच प्रशासनाने दिला आहे.

​बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार, मुलीचे वय १८ आणि मुलाचे वय २१ वर्षांपेक्षा कमी असताना विवाह करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. केवळ पालकांवरच नाही, तर या विवाहात सहभागी होणारे नातेवाईक, भटजी (पुरोहित), मंगल कार्यालय मालक, वाजंत्री आणि पत्रिका छापणारे अशा सर्वांवर कठोर कारवाईची टांगती तलवार आहे. या गुन्ह्यासाठी २ वर्षांपर्यंत सक्त मजुरी आणि १ लाख रुपये दंडाची कडक तरतूद आहे. त्यामुळे विवाहापूर्वी वयाची खात्री करणे ही सर्वांची कायदेशीर जबाबदारी आहे.

​तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागात प्रशासनाने आपले जाळे विणले आहे. ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका आणि पोलीस पाटील यांचे विशेष पथक अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असणार आहे. शहरी भागासाठी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषतः मंगल कार्यालये आणि लॉन्स मालकांना स्पष्ट सांगण्यात आले आहे की, वर-वधूच्या वयाचे अधिकृत पुरावे (जन्म दाखला किंवा बोनाफाइड) तपासल्याशिवाय कोणतेही बुकिंग घेऊ नये.

​बालविवाह ही केवळ कायद्याची पायमल्ली नसून ती एक सामाजिक अनिष्ट प्रथा आहे, ज्यामुळे बालकांचे आरोग्य आणि भविष्य धोक्यात येते. आपल्या परिसरात कुठेही गुपचूप बालविवाह होत असल्याची कुणकुण लागल्यास नागरिकांनी तत्काळ चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८ किंवा पोलीस नियंत्रण कक्ष ११२ वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, अशी ग्वाही तहसीलदार सचिन म्हस्के आणि तालुका संरक्षण अधिकारी श्री. चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

​”बालकांचे बालपण वाचवणे आणि त्यांचे आरोग्य जपणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. महाबळेश्वर तालुका बालविवाहमुक्त करण्यासाठी समाजाने प्रशासनाला सक्रिय सहकार्य करावे.” श्री. सचिन म्हस्के, तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, महाबळेश्वर.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : शेतकऱ्यांनो, सातबाऱ्यावरील चुका आता चुटकीसरशी होणार दुरुस्त; महाबळेश्वर तालुक्यात विशेष ‘महाराजस्व...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​महाबळेश्वर : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाच्या नवीन धोरणानुसार, 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियानाचा टप्पा आता महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या उत्साहात...

Panchgani news : जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आंब्रळ गावचा सुपुत्र हर्ष चिटणीस ‘सीबीएसई’ परीक्षेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क /प्रमोद रांजणे ​पाचगणी: प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची जिद्द आणि मेहनतीची तयारी असली की यश नक्कीच साध्य करता येते, याचा प्रत्यय आंब्रळ...

error: Content is protected !!