Homeमहाबळेश्वरPanchgani news : महाबळेश्वर तालुक्यात वनविभागाची मोठी कारवाई; खैर लाकडांच्या बेकायदेशीर वाहतुकीचा...

Panchgani news : महाबळेश्वर तालुक्यात वनविभागाची मोठी कारवाई; खैर लाकडांच्या बेकायदेशीर वाहतुकीचा पर्दाफाश, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पांचगणी न्यूज नेटवर्क 

महाबळेश्वर : सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वनसंपत्तीची लूट करणाऱ्या तस्करांविरुद्ध महाबळेश्वर वनविभागाने मोठी मोहीम उघडली असून, रात्रगस्तीदरम्यान खैर लाकडांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. वन परिमंडळ अधिकारी सुनील लांडगे आणि त्यांच्या पथकाने अत्यंत धाडसी कारवाई करत दोन वाहने जप्त केली असून, या प्रकरणी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे वनतस्करांचे धाबे दणाणले असून, निसर्गाचा वारसा जपण्यासाठी वनविभागाने उचललेल्या या पावलाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर परिक्षेत्रात वनविभागाचे पथक गस्त घालत असताना त्यांना संशयास्पद हालचाली आढळून आल्या. पथकाने तातडीने सापळा रचून तपासणी केली असता, महिंद्रा पिकअप (MH 08 H 7790) आणि महिंद्रा स्कॉर्पिओ (MH 43 R 0906) या दोन वाहनांमधून अत्यंत मौल्यवान मानल्या जाणाऱ्या खैर प्रजातीच्या लाकडाची विनापरवाना चोरटी वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. वनविभागाच्या सतर्कतेमुळे ही दोन्ही वाहने जागीच पकडण्यात यश आले. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या वाहनांसह खैर लाकडांचा एकूण अंदाजे ५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल वनविभागाने आपल्या ताब्यात घेतला आहे.

​या गंभीर गुन्ह्याप्रकरणी संतोष पांडुरंग पार्टे, समीर संतोष पार्टे (दोघेही राहणार केळघर, ता. जावळी, जि. सातारा) या संशयितांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशी दरम्यान या दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, वन परिमंडळ अधिकारी महाबळेश्वर यांनी भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम ४१ (२) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. महाबळेश्वर आणि जावळी हा भाग जैवविविधतेने नटलेला असल्याने येथील वनसंपत्तीवर तस्करांचा डोळा असतो, मात्र वनविभागाने या कारवाईद्वारे अशा प्रवृत्तींना कडक इशारा दिला आहे.

​सदरची यशस्वी कारवाई सातारा जिल्ह्याचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप रौंदळ आणि महाबळेश्वरचे वन परिक्षेत्र अधिकारी महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत सहभागी असलेल्या वन कर्मचारी व पथकाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. सह्याद्रीच्या दुर्गम भागात रात्री-अपरात्री गस्त घालून वनसंपत्तीचे रक्षण करण्याचे आव्हान वनविभाग समर्थपणे पेलत असल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास वन परिमंडळ अधिकारी सुनील लांडगे हे करत असून, यामध्ये आणखी कोणाचे धागेदोरे आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

Panchgani news : शेतकऱ्यांनो, सातबाऱ्यावरील चुका आता चुटकीसरशी होणार दुरुस्त; महाबळेश्वर तालुक्यात विशेष ‘महाराजस्व...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​महाबळेश्वर : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाच्या नवीन धोरणानुसार, 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियानाचा टप्पा आता महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या उत्साहात...

error: Content is protected !!