पाचगणी न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर : जय हनुमान मंडळ मेट गुताड यांच्या सौजन्याने मेट गुताड गावामध्ये आयोजित करण्यात आलेल्या किल्ले बांधणी स्पर्धेचा शानदार समारोप ग्रामपंचायत सभागृह मेट गुताड येथे उत्साहात पार पडला. या स्पर्धेला गावातील स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत, एकूण ३० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सहभागींनी माती, दगड, कागद व इतर साहित्याचा कल्पकतेने वापर करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारल्या, ज्यामुळे स्पर्धेतील वातावरण मंत्रमुग्ध करणारे होते.
लहानग्या मुलींच्या सहभागाने वेधले लक्ष
या स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी अविस्मरणीय आणि सर्वोत्तम कामगिरी करत किल्ले साकारले. विशेष म्हणजे, स्पर्धेतील ४ किल्ले सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. त्यांची प्रतिकृती हुबेहूब साकारण्यात आली होती. या स्पर्धेतील सर्वत्र चर्चेत असणारी विशिष्ट गोष्ट म्हणजे गावातील काही लहान मुलीनी देखील किल्ले बांधणी स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यांचा बनवलेला किल्ला पाहण्यासाठी अनेक ग्रामस्थ उपस्थित होते, जो विशेष कौतुकाचा विषय ठरला.
विजयी स्पर्धकांचा गौरव
स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले. क्रमांक विजेते पारितोषिक रक्कम
प्रथम गोपाळ कृष्ण मंडळ मेट गुताड रु. ३०,०१/-
द्वितीय जय हनुमान मंडळ मेटगुताड रु. २,००१/-
तृतीय ओजस मोहन बावळेकर आणि ग्रुप रु. १,००१/-
चतुर्थ आयुष उमेश बावळेकर रु. ५०१/-
उत्तेजनार्थ सुयश अनिल बावळेकर व श्रीराज प्रवीण बावळेकर
दात्यांचे मोलाचे सहकार्य
या भव्य स्पर्धेसाठी अनेक ग्रामस्थांनी आर्थिक आणि वस्तू स्वरूपात मोलाचे सहकार्य केले.
प्रथम पारितोषिक (रु. ३०,०१): श्री संतोष सखाराम बावळेकर (कै गणपत भैरू बावळेकर / कै जगन्नाथ भैरू बावळेकर / कै सावळा भैरू बावळेकर यांच्या स्मरणार्थ)
द्वितीय पारितोषिक (रु. २,००१): श्री संजय रामचंद्र बावळेकर
तृतीय पारितोषिक (रु. १,००१): श्री श्रीकांत चंद्रकांत बावळेकर
चतुर्थ पारितोषिक (रु. ५०१): श्री महेश सुरेश बावळेकर
सर्व चषक सौजन्य: श्री अंकुश (नाना )बावळेकर
सन्मान चिन्ह सौजन्य: श्री गणेश लक्ष्मण बावळेकर व श्री दिनेश लक्ष्मण बावळेकर
सर्व टी शर्ट सौजन्य: प्रविण पोपट ओंबळे, व सुमित आनंदा गोळे
या कार्यक्रमाला राजू आप्पा बावळेकर, उमेश बावळेकर (पाटील), धनंजय बावळेकर, ऋषिकेश बावळेकर, सनी बावळेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
पारितोषिक समारंभाला गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी, ग्रामपंचायत सरपंच व इतर सदस्य, तसेच जय हनुमान मंडळातील सर्व सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.
























