पाचगणी न्यूज नेटवर्क/सुनील धनावडे
सातारा :– टॉप गिअर जावली जोडी रन मध्ये धावणाऱ्या अन ज्यांनी रजिस्टेशन केले आहे अशा धावकांना 4 ऑक्टोबर रोजी जॅकेटचे वितरण करण्यात आले.
ज्या धावकांनी ठराविक मुदतित रजिस्ट्रेशन करून आपला सहभाग नोंदवला त्या धावकांना प्रेरणा म्हणून टॉप गिअर जोडी रन च्या टिमकडून जॅकेट देण्यात येणार आहे हे आयोजकांनी जाहीर केल्यामुळे धावकांनी रजिस्ट्रेशन करून जॅकेट मिळवले त्यामुळे टॉप गिअर जावली जोडी रन ही सर्वच धावकांचे प्रथम पसंतीची रन ठरली आहे .
९ नोव्हेंबर रोजी संपन्न होणारी टॉप गिअर जावली जोडी रन चे हे सहावे वर्ष आहे . दरवर्षी मोठ्यासंखेने धावक येथे सहभागी होतात . महिला बचत गटांच्या महिला नऊ वारी मध्ये धावत असतात तसेच अनेक धावक विशिष्ट पोषाख परिधान करून धावतात . मावळा , वासूदेव , वारकरी इत्यादी प्रकारचे पेहेराव करून धावणारे धावक कौतुकास पात्र ठरत आहेत .या वर्षीही अशा प्रकारचा जल्लोष आपणास पाहावयास मिळणार आहे .
जोडी रन म्हणजे वडील – मुलगा , वडील – मुलगी , दोन बहिणी , नवरा – बायको , सासू – सून , दोन जावा , सासू – जावाई , मामी – भाचा , बहीण – भाऊ , गुरु – शिष्य अशा अनेक प्रकारच्या जोड्या धावताना दिसणार आहेत .
जावळीचे माजी आमदार सदाशिव भाऊ सपकाळ,सातारा जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे,टॉप गिअर चे डायरेक्टर सौरभ पवार, समाजसेवक युवा नेते सागर धनावडे, बाजार समिती सभापती जयदीप शिंदे,ज्येष्ठ पत्रकार मोहन जगताप, तसेच कुलकर्णी हे उपस्थित होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष नवनाथ डिगे,सचिव संजय धनावडे,विलास डिगे, सुनील जाधव,पी आर पाटील, देवर्षी सर, अमोल आमले, तसेच जावळी जोडी रन चे टिम मेंबर हजर होते
























