HomeजावळीPanchgani news : जावलीच्या मातीतली जिद्द: रामवाडीचा सुपुत्र विक्रम पाडळे एमपीएससी परीक्षेत...

Panchgani news : जावलीच्या मातीतली जिद्द: रामवाडीचा सुपुत्र विक्रम पाडळे एमपीएससी परीक्षेत यशस्वी; ‘टॅक्स असिस्टंट’पदी निवड

पांचगणी न्यूज नेटवर्क

रामवाडी (ता. जावली): संकटांशी झुंजत, परिस्थितीची गरिबी पचवत जिद्दीच्या जोरावर शिखर गाठता येते, हे जावली तालुक्यातील रामवाडी येथील विक्रम दत्तात्रय पाडळे याने सिद्ध केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत विक्रमने घवघवीत यश मिळवत ‘टॅक्स असिस्टंट’ (कर साहाय्यक) या पदावर आपली मोहोर उमटवली आहे. संपूर्ण राज्यामध्ये ४२ वा रँक प्राप्त करत त्याने रामवाडीसह संपूर्ण जावली तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

​विक्रम पाडळे यांचा प्रवास हा संघर्षाची एक प्रेरणादायी गाथा आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून पुढे येताना त्याने कधीही हार मानली नाही. रामवाडी येथील प्राथमिक शाळेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्याने साताऱ्याची वाट धरली. घरची बेताची परिस्थिती असूनही त्याने आपल्या ध्येयापासून नजर ढळू दिली नाही. या कठीण काळात गावातील मित्र, तरुण वर्ग आणि ग्रामस्थांनी त्याच्या जिद्दीला ओळखून वर्गणी गोळा करत त्याला शिक्षणासाठी मोलाचा आधार दिला. आज मिळालेल्या या यशात आपल्या गावाची आणि ग्रामस्थांच्या प्रेमाची मोठी शिदोरी आहे, याची जाणीव विक्रमने कृतज्ञतापूर्वक व्यक्त केली आहे.

​सातव्या प्रयत्नात हे यश संपादन करत त्याने आपली जिद्द आणि सातत्य दाखवून दिले आहे. त्याच्या या नेत्रदीपक कामगिरीबद्दल गावात जल्लोषाचे वातावरण असून, ग्रामस्थ आणि युवकांनी त्याची वाजतगाजत मिरवणूक काढली. या वेळी विक्रमवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. एका सामान्य कुटुंबातील मुलाने कष्ट आणि संयमाच्या बळावर प्रशासकीय सेवेत प्रवेश केल्यामुळे परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे. विक्रमचे हे यश गावातील इतर तरुण पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

Panchgani news : शेतकऱ्यांनो, सातबाऱ्यावरील चुका आता चुटकीसरशी होणार दुरुस्त; महाबळेश्वर तालुक्यात विशेष ‘महाराजस्व...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​महाबळेश्वर : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाच्या नवीन धोरणानुसार, 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियानाचा टप्पा आता महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या उत्साहात...

error: Content is protected !!