Homeमहाबळेश्वरPanchgani news : शेतकऱ्यांनो, सातबाऱ्यावरील चुका आता चुटकीसरशी होणार दुरुस्त; महाबळेश्वर तालुक्यात...

Panchgani news : शेतकऱ्यांनो, सातबाऱ्यावरील चुका आता चुटकीसरशी होणार दुरुस्त; महाबळेश्वर तालुक्यात विशेष ‘महाराजस्व समाधान’ शिबिरांचा धडाका!

पांचगणी न्यूज नेटवर्क

​महाबळेश्वर : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाच्या नवीन धोरणानुसार, ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाचा टप्पा आता महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या उत्साहात राबविला जाणार आहे. हस्तलिखित सातबाऱ्याचे संगणीकरण करताना झालेल्या तांत्रिक चुकांमुळे अनेक शेतकरी बांधवांना अडचणींचा सामना करावा लागत होता. हीच समस्या मुळापासून उपटून काढण्यासाठी तहसीलदार सचिन म्हस्के यांनी तालुक्यात विशेष शिबिरांचे नियोजन केले असून, प्रत्यक्ष गावागावांत जाऊन सातबारा दुरुस्तीची मोहीम हाती घेतली आहे.

​महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १५५ नुसार, सातबाऱ्यातील नावांच्या चुका, क्षेत्रातील तफावत किंवा इतर तांत्रिक नोंदी दुरुस्त करण्यासाठी हे शिबीर सुवर्णसंधी ठरणार आहे. अनेकदा संगणीकृत सातबारा निघताना जुन्या हस्तलिखित नोंदी गाळल्या गेल्या आहेत किंवा त्या चुकीच्या पद्धतीने नोंदवल्या गेल्या आहेत. या सर्व त्रुटी दूर करण्यासाठी संबंधित सजांचे तलाठी आणि ग्राम महसूल अधिकारी नेमून दिलेल्या तारखांना सकाळीच गावात हजर राहतील. शेतकऱ्यांना तिथेच त्यांचे जुने हस्तलिखित सातबारे आणि नवे संगणीकृत सातबारे पडताळणीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

​तालुक्यातील दुर्गम भागातील शेतकऱ्यांची सोय व्हावी यासाठी प्रशासनाने गावनिहाय वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये २० ते २२ एप्रिल दरम्यान मालकमपेठ, पाचगणी, भिलार, कुंभरोशी यांसारख्या मोठ्या सजांसह एकूण १७ गावांमध्ये ही प्रक्रिया चालेल. त्यानंतर २३ आणि २४ एप्रिल रोजी मेटगुताड, पारपार, खरोशीसह इतर गावांचा टप्पा पूर्ण केला जाईल. उचाट सजासाठी २२ व २३ एप्रिल, तर अहिर सजासाठी २० आणि २१ एप्रिल ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. या नियोजित दिवशी तलाठी कार्यालय किंवा ग्रामपंचायत कार्यालयात हे काम चालणार आहे.

​या मोहिमेबाबत अधिक माहिती देताना तहसीलदार सचिन म्हस्के यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांनी सातबाऱ्याची खात्री करून जर काही चुकीची नोंद आढळली, तर त्याच दिवशी तात्काळ अर्ज सादर करावा. प्राप्त अर्जांची तातडीने छाननी केली जाईल आणि सातबारा दुरुस्त करून पुन्हा निर्दोष सातबाऱ्याचे वाटप त्याच गावात केले जाईल.” प्रशासनाच्या या ‘दप्तर आपल्या दारी’ उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयात जाणारा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहेत. तरी महाबळेश्वर तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांनी या संधीचा लाभ घेऊन आपले सातबारे अद्ययावत करून घ्यावेत, असे कळकळीचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

Panchgani news : जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आंब्रळ गावचा सुपुत्र हर्ष चिटणीस ‘सीबीएसई’ परीक्षेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क /प्रमोद रांजणे ​पाचगणी: प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची जिद्द आणि मेहनतीची तयारी असली की यश नक्कीच साध्य करता येते, याचा प्रत्यय आंब्रळ...

error: Content is protected !!