Homeमहाबळेश्वरPanchgani news : बोंडारवाडीत श्री संत बाळूमामांच्या ओव्यांच्या कार्यक्रमाने रंगणार भंडारा उत्सव...

Panchgani news : बोंडारवाडीत श्री संत बाळूमामांच्या ओव्यांच्या कार्यक्रमाने रंगणार भंडारा उत्सव सोहळा

पांचगणी न्यूज नेटवर्क
​बोंडारवाडी : सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या बोंडारवाडी धनगरवाडी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री सद्गुरू संत बाळूमामा फोटो पूजन व भंडारा उत्सव सोहळ्याचे अतिशय उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक ११ एप्रिल रोजी होणाऱ्या या सोहळ्यात देव अवतारी श्री संत बाळूमामांच्या जीवनावर आधारित ओव्यांचा हृदयस्पर्शी कार्यक्रम भाविकांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. आदमापूर येथील श्री सद्गुरू संत बाळूमामा देवस्थानचे प्रमुख मानकरी आणि माकणून कथनकर मा. श्री. कृष्णात बाबुराव डोणे (वाघापुरे महाराज) यांच्या शुभहस्ते या सोहळ्यातील विविध धार्मिक विधी संपन्न होणार आहेत. बाळूमामांच्या भक्तीचा महिमा आणि त्यांच्या लोककल्याणाच्या कार्याचा वारसा जतन करण्यासाठी ग्रामस्थ मंडळ बोंडारवाडी धनगरवाडी यांच्या वतीने या महोत्सवाचे नेटके नियोजन करण्यात आले आहे.

​या कार्यक्रमाची सुरुवात शनिवारी दुपारी साडेतीन वाजता वाजत-गाजत निघणाऱ्या भव्य आगमन स्वागत मिरवणुकीने होईल. त्यानंतर दुपारी साडेचार वाजता मान्यवरांच्या हस्ते मामांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात येईल. सायंकाळी साडेपाच वाजता या उत्सवातील मुख्य आकर्षण असलेल्या ओव्यांच्या कार्यक्रमाला प्रारंभ होईल, ज्यामध्ये मामांच्या जीवनातील अलौकिक प्रसंग आणि त्यांच्या शिकवणीचा जागर केला जाणार आहे. ओव्यांच्या कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांच्या उपस्थितीत महाआरती संपन्न होऊन त्यानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाईल.

​बोंडारवाडी ता. महाबळेश्वर येथील या सोहळ्यासाठी श्री संत बाळूमामा सेवा समिती, ग्रामस्थ मंडळ आणि महिला मंडळ बोंडारवाडी धनगरवाडी यांच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील आणि महाबळेश्वर परिसरातील समस्त भाविकांनी या भंडारा उत्सवाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वागतोत्सुक समितीच्या वतीने करण्यात आले आहे. बाळूमामांच्या जयघोषाने अवघी धनगरवाडी दुमदुमून जाणार असून, या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात भक्तीचे चैतन्य पसरले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

Panchgani news : शेतकऱ्यांनो, सातबाऱ्यावरील चुका आता चुटकीसरशी होणार दुरुस्त; महाबळेश्वर तालुक्यात विशेष ‘महाराजस्व...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​महाबळेश्वर : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाच्या नवीन धोरणानुसार, 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियानाचा टप्पा आता महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या उत्साहात...

error: Content is protected !!