Homeमहाबळेश्वरPanchgani news : महाबळेश्वर हादरले! १७ वर्षीय विद्यार्थिनीची राहत्या घरी आत्महत्या; परिसरात...

Panchgani news : महाबळेश्वर हादरले! १७ वर्षीय विद्यार्थिनीची राहत्या घरी आत्महत्या; परिसरात शोककळा

पांचगणी न्यूज नेटवर्क

महाबळेश्वर: निसर्गरम्य महाबळेश्वर तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. क्षेत्र महाबळेश्वर येथे एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीने राहत्या घरी आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. खुशी दशरथ पवार असे या मृत विद्यार्थिनीचे नाव असून, ती इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेत होती.

​रविवारी ५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. खुशीने टोकाचे पाऊल उचलल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांनी त्वरित या घटनेची माहिती महाबळेश्वर पोलिसांना दिली. मृत मुलीचे चुलते रमेश दत्तात्रय पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाबळेश्वर पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद (अ.म. रजिस्टर क्रमांक ०९/२०२६) करण्यात आली आहे.

​या घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मर्देकर या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा पूर्ण केला असून विविध अंगांनी चौकशी केली जात आहे. खुशीच्या निधनामुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून, अल्पवयीन मुलांमधील मानसिक तणावाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

Panchgani news : शेतकऱ्यांनो, सातबाऱ्यावरील चुका आता चुटकीसरशी होणार दुरुस्त; महाबळेश्वर तालुक्यात विशेष ‘महाराजस्व...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​महाबळेश्वर : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाच्या नवीन धोरणानुसार, 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियानाचा टप्पा आता महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या उत्साहात...

error: Content is protected !!