पांचगणी न्यूज नेटवर्क
सायगाव : जावळी तालुक्यातील पवारवाडी येथील माजी सरपंच आणि धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते संजय प्रतापराव पवार (वय ५५) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण जावळी तालुक्यासह सायगाव परिसरात शोककळा पसरली आहे. पवारवाडी गावच्या विकासकामांत त्यांचा मोठा सहभाग होता, तसेच तालुक्यातील सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रांत त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता.
संजय पवार यांचे प्राथमिक शिक्षण पाचगणी येथे झाले होते. आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. त्यांच्या निधनामुळे पवार कुटुंबासह संपूर्ण पंचक्रोशीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पार्थिवावर पवारवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, सायगाव भागातील ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुली आणि वारकरी संप्रदायातील त्यांचे बंधू ह.भ.प. विजय महाराज पवार असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, साहेबराव आबाजी पवार, वसंतराव मानकुमरे, युवा नेते दीपक पवार, जिल्हा परिषद सदस्या जयश्री गिरी, सभापती सौरभ शिंदे, उपसभापती गोरख महाडिक यांच्यासह अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.
























