Homeमहाबळेश्वरPanchgani news: मेट गुताड येथे किल्ले स्पर्धेचा शानदार समारोप: गोपाळ कृष्ण मंडळ...

Panchgani news: मेट गुताड येथे किल्ले स्पर्धेचा शानदार समारोप: गोपाळ कृष्ण मंडळ ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी!

पाचगणी न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर : ​जय हनुमान मंडळ मेट गुताड यांच्या सौजन्याने मेट गुताड गावामध्ये आयोजित करण्यात आलेल्या किल्ले बांधणी स्पर्धेचा शानदार समारोप ग्रामपंचायत सभागृह मेट गुताड येथे उत्साहात पार पडला. या स्पर्धेला गावातील स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत, एकूण ३० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सहभागींनी माती, दगड, कागद व इतर साहित्याचा कल्पकतेने वापर करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारल्या, ज्यामुळे स्पर्धेतील वातावरण मंत्रमुग्ध करणारे होते.

लहानग्या मुलींच्या सहभागाने वेधले लक्ष
​या स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी अविस्मरणीय आणि सर्वोत्तम कामगिरी करत किल्ले साकारले. विशेष म्हणजे, स्पर्धेतील ४ किल्ले सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. त्यांची प्रतिकृती हुबेहूब साकारण्यात आली होती. या स्पर्धेतील सर्वत्र चर्चेत असणारी विशिष्ट गोष्ट म्हणजे गावातील काही लहान मुलीनी देखील किल्ले बांधणी स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यांचा बनवलेला किल्ला पाहण्यासाठी अनेक ग्रामस्थ उपस्थित होते, जो विशेष कौतुकाचा विषय ठरला.

विजयी स्पर्धकांचा गौरव
​स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले.    क्रमांक विजेते पारितोषिक रक्कम
प्रथम गोपाळ कृष्ण मंडळ मेट गुताड रु. ३०,०१/-
द्वितीय जय हनुमान मंडळ मेटगुताड रु. २,००१/-
तृतीय ओजस मोहन बावळेकर आणि ग्रुप रु. १,००१/-
चतुर्थ आयुष उमेश बावळेकर रु. ५०१/-
उत्तेजनार्थ सुयश अनिल बावळेकर व श्रीराज प्रवीण बावळेकर

दात्यांचे मोलाचे सहकार्य
​या भव्य स्पर्धेसाठी अनेक ग्रामस्थांनी आर्थिक आणि वस्तू स्वरूपात मोलाचे सहकार्य केले.
​प्रथम पारितोषिक (रु. ३०,०१): श्री संतोष सखाराम बावळेकर (कै गणपत भैरू बावळेकर / कै जगन्नाथ भैरू बावळेकर / कै सावळा भैरू बावळेकर यांच्या स्मरणार्थ)
​द्वितीय पारितोषिक (रु. २,००१): श्री संजय रामचंद्र बावळेकर
​तृतीय पारितोषिक (रु. १,००१): श्री श्रीकांत चंद्रकांत बावळेकर
​चतुर्थ पारितोषिक (रु. ५०१): श्री महेश सुरेश बावळेकर
​सर्व चषक सौजन्य: श्री अंकुश (नाना )बावळेकर
​सन्मान चिन्ह सौजन्य: श्री गणेश लक्ष्मण बावळेकर व श्री दिनेश लक्ष्मण बावळेकर
सर्व टी शर्ट सौजन्य: प्रविण पोपट ओंबळे, व सुमित आनंदा गोळे
​या कार्यक्रमाला राजू आप्पा बावळेकर, उमेश बावळेकर (पाटील), धनंजय बावळेकर, ऋषिकेश बावळेकर, सनी बावळेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
​पारितोषिक समारंभाला गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी, ग्रामपंचायत सरपंच व इतर सदस्य, तसेच जय हनुमान मंडळातील सर्व सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ;...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'तुमच्या घराचा...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

error: Content is protected !!