
पांचगणी न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर : सौंदरी ( ता. महाबळेश्वर) येथील रखमाजी बाबुराव जाधव यांचा सुपुत्र कु. कुणाल रखमाजी जाधव याने आपल्या विभागाची, सातारा जिल्ह्याची आणि महाराष्ट्र राज्याची मान उंचावली आहे.
वाई येथे आयोजित करण्यात आलेल्या ओपन नॅशनल स्पोर्ट्स क्लाइंबिंग चॅम्पियनशिप २०२५ मध्ये ‘ युथ अ बॉय ‘ गटामध्ये महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करीत असताना भारतातील दिग्गज खेळाडूंना मागे टाकत ब्राँझ मेडल (कांस्य पदक) मिळवले आहे.
या यशामुळे राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचा ठसा उमटविणारा आणखी एक हिरा कोयना, सोळशी, कांदाटी विभागाला मिळाल्याचा आनंद सर्व पंचक्रोशीत आहे.
कुणालच्या यशामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या यशाचे श्रेय कुणाला देणार असे विचारले असता त्याचे प्रशिक्षक, आई-वडील,चुलते व त्याचे ग्रामदैवत श्री सोमजाई गवरजाई देवीचा आशीर्वाद यांना देतो असे त्याने सांगितले.
























