Homeमहाबळेश्वरराजमाता अहिल्यादेवींकडून समाज उद्धाराचे काम : ना. मकरंद पाटील; महाबळेश्वरमध्ये वास्तुशिल्पाचे लोकार्पण

राजमाता अहिल्यादेवींकडून समाज उद्धाराचे काम : ना. मकरंद पाटील; महाबळेश्वरमध्ये वास्तुशिल्पाचे लोकार्पण

पांचगणी न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य धनगर समाजापुरते मर्यादित नाही. जाती धर्मापलीकडे जाऊन समाजातील उपेक्षित घटकास सोबत घेऊन त्यांनी समाज उद्धाराचे काम केले. अत्यंत नेटाने व प्रामाणिकपणे केलेल्या कार्यामुळेच त्या ओळखल्या जातात, असे प्रतिपादन ना. मकरंद पाटील यांनी केले.

म’श्वर पालिका व राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य साधून वास्तुशिल्पाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ना. पाटील बोलत होते. यावेळी मुख्याधिकारी योगेश पाटील, माजी सभापती संजूबाबा गायकवाड, जिल्हा बँक संचालक राजेंद्र राजपुरे, माजी नगराध्यक्ष किसनराव शिंदे, डी.एम. वावळेकर, विमल पार्टे, बबनराव ढेबे, संतोष आखाडे, प्रवीण भिलारे, बाबुराव सकपाळ, बाबुराव कात्रट, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाळू ढेबे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

ना. मकरंद पाटील म्हणाले, राजमाता अहिल्यादेवींचे वास्तुशिल्प उभे राहत असल्याचा आनंद आहे. अहिल्यादेवींनी त्यांच्या कार्यकाळात केले त्या काळात समाजातील रूढी परंपरेला झुगारून त्यांनी धर्म आणि संस्कृतीचे रक्षण केले. देशभरातील १२ ज्योतिर्लिंगांचा जीर्णोध्दार केला. काशी विश्वनाथ मंदिराची पुनर्बाधणीसह अनेक ऐतिहासिक घाटांचे निर्माण अशी धार्मिक कामे देखील त्यांच्या हातून घडली. सरकारने चौंडी, ता. जामखेड येथील त्यांच्या स्मृतीस्थळाचे जतन व संर्वधन करण्यासाठी ६८१ कोटी रुपये मंजूर केले आहे.

योगेश पाटील म्हणाले, गतवर्षीच राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या वास्तुशिल्पाचे काम पूर्णत्वास गेले असते. मात्र, तांत्रिक त्रुटींमुळे हे काम करण्यास विलंब झाला. ना. मकरंद पाटील व जयंती उत्सव समितीच्या सहकार्यामुळेच राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकाचे काम पूर्णत्वास गेले आहे. हा चौक सुशोभित करण्यात आल्यामुळे शहराच्या वैभवात भर पडली आहे. प्रास्ताविक रोहित ढेबे यांनी केले. आभार रमेश चोरमले यांनी मानले. यावेळी निवास शिंदे, अर्बन बँक अध्यक्ष समीर सुतार, उपाध्यक्ष शरद बावळेकर, माजी नगरसेवक नासिर मुलाणी, अॅड. संजय जंगम, विशाल तोष्नीवाल, रवींद्र कुंभारदरे, विमलताई ओंबळे, राजेश कुंभारदरे, दत्तात्रय वाडकर,अभय डोईफोडे, सतीश ओंबळे, सुनिल आखाडे, सुरेखा आखाडे, सी. डी. बावळेकर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जयंती उत्सव समितीचे उत्सव समितीची अध्यक्ष वाळू आखाडे उपाध्यक्ष रवींद्र ढाणक कार्याध्यक्ष शंकर ढेबे, किरण काळे, प्रकाश कात्रट, प्रशांत आखाडे, अशोक ढेबे, सुनील ढेबे यांनी परिश्रम केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ;...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'तुमच्या घराचा...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

error: Content is protected !!