पांचगणी न्यूज नेटवर्क
तापोळा : शिंदी विभागातील वलवन येथे आरोग्य उपकेंद्र मंजूर झाले असून या दवाखान्याच्या इमारतीचे भूमी पूजन आज विविध मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने व कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिंदी गावचे सुपुत्र भूषण मोरे , नितीन मोरे व नवतरुण मित्र मंडळ मौजे शिंदी मुंबई यांच्या पाठपुराव्याने शिंदी विभागातील वलवन येथे आरोग्य उपकेंद्र मंजूर झाले आहे. या दवाखान्याच्या इमारतीचे भूमिपूजन चकदेव गावचे सुपुत्र लक्ष्मण गणपत जंगम यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला महाबळेश्वर तालुका शिवसेना प्रमुख गणेश उतेकर , शिंदी गावचे सुरेश लाडकोजीराव मोरे , वलवन गावचे सिताराम नारायण जाधव, आरव गावचे सरपंच सुनील शेलार, शिंदी गावचे शंकर धाकलिंग जंगम, अनंत निळकंठ मोरे, सतीश लक्ष्मण मोरे, आनंद नावडे सरपंच तापोळा, श्रीराम सकपाळ सरपंच वेळापूर, बबन सकपाळ सरपंच अहिर , विठ्ठल जाधव (वलवन), अशोक शिंदे,विकास मोरे,योगेश मोरे, सौरभ मोरे, संदेश जंगम, अजित म. मोरे, संजय मोरे, रणधीर मोरे,संतोष जंगम, कृष्णा जाधव, भीमाजी जाधव, रामचंद्र जंगम, राजेंद्र ढेबे, भगवान माने, आदी भागातील शिंदी, चगदेव, वळवन, पू- मोरणी, आरव, मोरनी म्हाळुंगे ह्या गावचे ग्रामस्थ महिला वर्ग उपस्थित होते.
























