पाचगणी न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर : पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांतील एमएस-सीआयटी केंद्र संचालकांची वार्षिक सभा कराड येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेत विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या केंद्र संचालकांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या वेळी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील ‘अश्वटेक कॉम्प्युटर’चे संचालक श्री. विलास उतेकर यांना ‘बेस्ट परफॉर्मन्स’ या प्रतिष्ठित पुरस्काराने एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
श्री. उतेकर यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाद्वारे सक्षम बनविण्यासाठी गेली 20 वर्षे अखंडपणे कार्य केले आहे. स्थानिक युवक-युवतींमध्ये संगणक साक्षरतेचा प्रसार करण्याचे त्यांचे योगदान अत्यंत उल्लेखनीय असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
या कार्यक्रमास एमकेसीएलचे वरिष्ठ अधिकारी अमित रानडे (सिनियर जनरल मॅनेजर), अतुल पतोडी (सिनियर जनरल मॅनेजर) तसेच पश्चिम विभागाचे आरएलसी को-ऑर्डिनेटर अनिल गावंडे सर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
























