HomeपांचगणीPanchgani news : पाचगणीत राजकीय भूकंप: १५ वर्षांची सत्ता गमावल्यानंतर लक्ष्मी कराडकर...

Panchgani news : पाचगणीत राजकीय भूकंप: १५ वर्षांची सत्ता गमावल्यानंतर लक्ष्मी कराडकर यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

पाचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : पाचगणीच्या राजकारणात आज एक मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. सलग १५ वर्षे पाचगणी नगरपालिकेवर एकहाती वर्चस्व गाजवणाऱ्या माजी नगराध्यक्षा लक्ष्मी कराडकर यांनी अखेर आपल्या समर्थक नगरसेवकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. सातारा येथील साहित्य संमेलनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जिह्यातील भाजपच्या सर्व नगरसेवक व नगराध्यक्षांचा सरकार सोहळा पार पडला. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची उपस्थिती होती.

गेल्या १५ वर्षांपासून पाचगणीत कराडकर गटाची निर्विवाद सत्ता होती. मात्र, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने मुसंडी मारत कराडकर यांच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. राष्ट्रवादीच्या या धक्क्यामुळे कराडकर यांना प्रथमच सत्तेपासून दूर व्हावे लागले. सत्तेची समीकरणे बदलल्याने आणि आगामी काळात शहरात आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी कराडकर यांनी आता भाजपची साथ घेण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपचे ‘कमळ’ हाती घेणारे पाच शिलेदार
यावेळी केवळ लक्ष्मी कराडकरच नव्हे, तर त्यांच्यासोबत पाच नगरसेवकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. यात स्वतः लक्ष्मी कराडकर (माजी नगराध्यक्षा), वैभव कराडकर, प्रसाद कारंजकर,विनोद बिरामणे, अभिलाषा कराडकर यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादीकडे सत्ता गेल्यापासून कराडकर गट काहीसा बॅकफूटवर होता. मात्र, आता थेट सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केल्याने शहरात भाजप एक ‘सक्षम विरोधक’ म्हणून उभा ठाकला आहे. लक्ष्मी कराडकर यांचा प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव आणि पाच नगरसेवकांची साथ यामुळे नगरपालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादीला आता भाजपच्या आक्रमक विरोधाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
या घडामोडीमुळे पाचगणीतील राजकारण आता अधिक चुरशीचे झाले असून, राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा नवा संघर्ष येणाऱ्या काळात पाहायला मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ;...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'तुमच्या घराचा...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

error: Content is protected !!