नवी मुंबई (कोपरखैरणे):
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम आता एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. प्रभाग क्रमांक १२ (सेक्टर १४ ते २३) मधील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) च्या अधिकृत उमेदवार सौ. अश्विनी सुयोग बेलोशे यांच्या प्रचाराला आता ‘राज’मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते आणि महाराष्ट्राच्या तरुणाईचे लाडके मा. अमितजी ठाकरे यांनी आज बेलोशे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा दर्शवला. या भेटीमुळे कोपरखैरणे परिसरात परिवर्तनाचे वारे वाहू लागले असून अश्विनी बेलोशे यांच्या विजयाची चर्चा आता घराघरात पोहोचली आहे.
भव्य स्वागत आणि कार्यकर्त्यांचा उत्साह
अमित ठाकरे यांचे आगमन होताच प्रभाग १२ मध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. उमेदवार अश्विनी बेलोशे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ आणि स्मृतीचिन्ह देऊन भावपूर्ण स्वागत केले. या भेटीनंतर काढण्यात आलेल्या एका छोटेखानी रॅलीमध्ये अमित ठाकरेंनी मतदारांशी संवाद साधला. त्यांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश भरला असून “आता मागे हटायचे नाही,” असा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.
‘मराठी माणसाचा आवाज’ आणि भावनिक आवाहन
याप्रसंगी मार्गदर्शन करताना अमित ठाकरे यांनी मराठी एकजुटीवर भर दिला. “मराठी माणसांनी आपला हक्काचा उमेदवार निवडून द्यावा,” असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. प्रस्थापितांच्या राजकारणाला कंटाळलेल्या जनतेसाठी अश्विनी बेलोशे हा एक आश्वासक चेहरा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीची वज्रमुठ!
या भेटीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक पातळीवर निर्माण झालेली अभूतपूर्व युती. शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी (शरद पवार पक्ष) या तिन्ही शक्ती आता अश्विनी बेलोशे यांच्या पाठीशी उभ्या ठाकल्या आहेत. “आम्ही सर्वजण आता एकत्र आलो असून प्रस्थापितांचा बीमोड केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मतदारांनी भूलथापांना बळी न पडता आपल्या हक्काच्या ताईंना, अश्विनी बेलोशे यांना विजयी करावे,” असे भावनिक आवाहन यावेळी करण्यात आले.
“अश्विनी बेलोशे यांचा विजय आता निश्चित आहे. ही लढाई केवळ एका उमेदवाराची नसून, प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या सन्मानाची आहे. आता रान पेटवा आणि विजयाचा गुलाल उधळा!” – कार्यकर्त्यांचा निर्धार.
प्रभाग १२ चा विकास, हाच आमचा ध्यास!
उमेदवार: सौ. अश्विनी सुयोग बेलोशे
























