HomeपांचगणीPanchgani news: अल्पवयीन मुलीला पळविणाऱ्या आरोपीला पाचगणी पोलिसांकडून अटक; अंबरनाथमध्ये लावला छडा...

Panchgani news: अल्पवयीन मुलीला पळविणाऱ्या आरोपीला पाचगणी पोलिसांकडून अटक; अंबरनाथमध्ये लावला छडा ; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

पाचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : लग्नाचे आमिष दाखवून एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला पाचगणी पोलिसांनी मोठ्या कौशल्याने बेड्या ठोकल्या आहेत. सनी गौतम कुचेकर (वय २६, रा. मुगाव, जि. धाराशिव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तांत्रिक तपासाचे आव्हान पेलत पोलिसांनी आरोपीला अंबरनाथ (जि. ठाणे) येथून ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचगणी येथील एका १२ वर्षे ८ महिने वयाच्या मुलीसोबत आरोपी सनी कुचेकर याची ओळख होती. मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असूनही, त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले. २४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्याने मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यातून पळवून नेले. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी पाचगणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तातडीने भा.न्या.सं. कलम १३७ आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

प्रकरण संवेदनशील असल्याने सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी तपासाचे आदेश दिले होते. आरोपी आपला मोबाईल फोन बंद ठेवून वारंवार ठिकाणे बदलत होता. पोलिसांनी तपासासाठी विशेष पथके तयार करून परांडा (धाराशिव) आणि करमाळा (सोलापूर) येथे शोध घेतला, मात्र आरोपी मिळून आला नाही. अखेर तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी आणि पीडित मुलगी अंबरनाथमध्ये असल्याची माहिती मिळाली. पथकाने तातडीने त्याठिकाणी धाव घेऊन आरोपीला अटक केली.

पीडित मुलीला सुरक्षितपणे तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपी सनी कुचेकर याला न्यायालयात हजर केले असता, त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगणीचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, उपनिरीक्षक बालाजी सोनुने, रवींद्र कदम, श्रीकांत कांबळे, निलेश माने, सीमा फरांदे आणि सुमित मोहिते यांच्या पथकाने केली. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी पथकाचे कौतुक केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ;...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'तुमच्या घराचा...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

error: Content is protected !!