HomeतापोळाPanchgani news: रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार ; महाबळेश्वर तालुक्यातील घटना

Panchgani news: रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार ; महाबळेश्वर तालुक्यातील घटना

पाचगणी न्यूज नेटवर्क
तापोळा : सोनाट (तालुका महाबळेश्वर ) येथील ग्रामस्थ राघू जानू कदम या शेतकऱ्याचा गव्याच्या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात ऐन दिवाळीत शोककळा पसरली आहे.

राघू कदम हे सकाळी शेतीची कामे करण्यासाठी शेतात गेले होते. दुपार नंतर गावातील अन्य लोक शेतात जात असताना राघू कदम धारातीर्थी पडलेले काही लोकांना दिसले. हल्ला इतका जबरदस्त होता की गव्याचे शिंग राघू यांच्या छाती फाडून निघाले होते. हल्ला चढवून जोरदार धडक दिल्याने राघू कदम हे जागीच ठार झाले.

या विभागात रान गाव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतीचे नुकसान करत आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी यांनी शेती करणे सोडून दिले आहे. आजच्या घटनेमुळे गावातील तसेच विभागातील शेतकरी यांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गव्याचा हल्ला एवढा प्रचंड होता हो राघू कदम यांच्या शरीराच्या चिधड्या झाल्या आहेत. ही दुःखद घटना समजताच विभागातील लोकांचा जनसमुदाय घटनास्थळी जमा झाला. रानगवे, रान डुक्कर यांच्या त्रासामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. या घटनेमुळे लोकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
घटना स्थळी फॉरेस्ट अधिकारी, पोलीस कर्मचारी उपस्थित झाले. मयताचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी पुढील कार्यवाही सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ;...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'तुमच्या घराचा...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

error: Content is protected !!