HomeपांचगणीPanchgani news : भिलारमध्ये महसूल समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३५५ दाखल्यांचे वितरण

Panchgani news : भिलारमध्ये महसूल समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३५५ दाखल्यांचे वितरण

पांचगणी न्यूज नेटवर्क

पाचगणी : वाई उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि महाबळेश्वर तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भिलार येथील केंद्र शाळेत आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’ला नागरिकांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला. शासनाच्या विविध सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळाल्याने नागरिकांची प्रलंबित कामे जलद गतीने मार्गी लागली.

  1. या शिबिराचा मुख्य उद्देश महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रकरणांचा जागेवरच निपटारा करणे हा होता. त्यानुसार उत्पन्न प्रमाणपत्रे ४९, रहिवास दाखले २४, जात प्रमाणपत्रे ३, नॉन-क्रीमीलेयर दाखले, संजय गांधी योजनेअंतर्गत १८ प्रकरणे, सामाजिक अर्थसहाय्य योजना, रेशन कार्ड दुरुस्ती २८, दुबार रेशन कार्ड ५० तसेच पीएम किसान योजनेअंतर्गत ६८ लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. एकूण ३५५ दाखल्यांचे वितरण करण्यात आल्याने अनेक नागरिकांची रखडलेली कामे तत्काळ पूर्ण झाली.
    याचबरोबर शिबिरात आरोग्य तपासणी व क्षयरोग निदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. सातबारा उतारे, फेरफार, नामांतरण, उत्पन्न व जात प्रमाणपत्रे यांसारख्या विविध शासकीय सेवांबाबत मार्गदर्शन करून अनेक अर्ज जागेवरच निकाली काढण्यात आले.

या शिबिराला उपजिल्हाधिकारी मोरे मॅडम, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार सचिन मस्के, नायब तहसीलदार दीपक सोनावणे, उपअधीक्षक भूमी अभिलेख साळुंखे, मंडळ कृषी अधिकारी दीपक बोर्डे, पंचायत समिती सभापती शकुंतला चोरमले, सदस्य वंदना भिलारे, गटविकास अधिकारी विजय विभुते, जिल्हा नियोजन कमिटी सदस्य प्रवीणशेठ भिलारे, तेजस्विनी भिलारे, वैशाली भिलारे तसेच विविध मान्यवर आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

या उपक्रमामुळे नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी सहज उपलब्ध झाल्याने वेळ आणि खर्चाची मोठी बचत झाली. स्थानिकांनी प्रशासनाच्या या उपक्रमाचे स्वागत करत असे शिबिरे नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ;...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'तुमच्या घराचा...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

error: Content is protected !!