HomeपांचगणीPanchgani news : पाचगणीत रामजन्मोत्सव सोहळ्याचा उत्साह; विविध मंडळांच्या वतीने भरगच्च कार्यक्रमांचे...

Panchgani news : पाचगणीत रामजन्मोत्सव सोहळ्याचा उत्साह; विविध मंडळांच्या वतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

पांचगणी न्यूज नेटवर्क

पाचगणी : प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून पाचगणी आणि परिसरातील विविध सामाजिक व क्रीडा मंडळांच्या वतीने गुरुवारी (दि. २६ मार्च २०२६) भव्य श्रीराम नवमी उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने शहरात भक्तीमय वातावरणात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार असून, संपूर्ण परिसरातील भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

​उत्सवाचा प्रारंभ सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्रीराम चौक या मार्गावर निघणाऱ्या श्रीराम प्रतिमेच्या भव्य मिरवणुकीने होणार आहे. पारंपारिक वाद्यांच्या गजरात निघणारी ही मिरवणूक पाचगणी शहराचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. दुपारी १२ वाजता श्रीराम चौक येथे प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन आणि महाआरती संपन्न होईल. त्यानंतर दुपारी १ ते ४ या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तीच्या या सोहळ्यात दुपारी ४ ते ७ या दरम्यान सुस्वर भजनांचा कार्यक्रम रंगणार असून, सायं. ६:३० वाजता दीपोत्सवाने संपूर्ण परिसर उजळून निघणार आहे. रात्री ७ वाजता या मंगलमय सोहळ्याची सांगता होईल.

​या भव्य सोहळ्याचे नियोजन श्रीराम उत्सव समिती, पाचगणी यांच्यासह शिवजयंती उत्सव समिती, हनुमान मंडळ, शाहूनगर, कार्तिकस्वामी क्रीडा मंडळ (राजपुरी), नेहरू युवा मंडळ (आंबळ), जन्नीमाता कला क्रीडा मंडळ (खिंगर), तपनेश्वर सेवा मंडळ (गोडवली), केदारेश्वर सेवा मंडळ (दांडेघर) आणि नवयुग क्रीडा मंडळ (तायघाट) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी पाचगणी शहर आणि परिसरातील डोंगरदऱ्यांतील वाड्या-वस्त्यांवरील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ;...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'तुमच्या घराचा...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

error: Content is protected !!