HomeपांचगणीPanchgani news : घोटेघरमध्ये रानडुकरांचा स्ट्रॉबेरीला मोठा फटका; दोन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे...

Panchgani news : घोटेघरमध्ये रानडुकरांचा स्ट्रॉबेरीला मोठा फटका; दोन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान ​वनविभागाने दखल न घेतल्यास आत्मदहनाचा इशारा; जावळी तालुक्यात शेतकरी संतप्त

पाचगणी न्यूज नेटवर्क
​भोसे: जावळी तालुक्यातील घोटेघर परिसरात रानडुकरांच्या कळपाने हैदोस घातला असून, काल रात्री दोन तरुण शेतकऱ्यांच्या स्ट्रॉबेरी पिकाचे आतोनात नुकसान केले. ऐन तोडणीला आलेले पीक डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाल्याने राजकुमार महाडिक आणि अक्षय रांजणे या शेतकऱ्यांचे सुमारे २ ते २.५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेला शेतकरी आता पूर्णपणे हतबल झाला असून, वनविभागाने तातडीने दखल न घेतल्यास आत्मदहन करण्याचा इशारा राजकुमार महाडिक यांनी दिला आहे.

​भिलार परिसरापासून जवळच असलेल्या घोटेघर गावात अलीकडे स्ट्रॉबेरी उत्पादनावर शेतकऱ्यांनी मोठा भर दिला आहे. गावातील अनेक तरुणांनी पारंपरिक शेतीला फाटा देत स्ट्रॉबेरीच्या माध्यमातून आपली आर्थिक प्रगती साधण्यास सुरुवात केली होती. मात्र, यावर्षी निसर्गाने सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांची परीक्षा घेतली आहे. अतिवृष्टीमुळे स्ट्रॉबेरीची लागवड उशिरा झाली, त्यातच हंगाम लांबणीवर पडल्याने बाजारपेठेत अपेक्षित दरही मिळेनासे झाले आहेत. अशा दुहेरी संकटात असतानाच आता रानटी जनावरांच्या त्रासाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

​काल रात्री रानडुकरांच्या एका मोठ्या कळपाने राजकुमार महाडिक आणि अक्षय रांजणे यांच्या शेतात शिरून पिकाची मोठी नासधूस केली. काढणीला आलेली फळे फस्त करण्यासोबतच डुकरांनी रोपेही उखडून टाकली आहेत. या नुकसानीमुळे हे दोन्ही शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. वनविभागाने या रानटी जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

​या संदर्भात संताप व्यक्त करताना राजकुमार महाडिक म्हणाले की, “लाखो रुपये कर्ज काढून आणि अतोनात कष्ट करून आम्ही हे पीक उभे केले होते. मात्र रानडुकरांनी सर्व काही संपवले आहे. जर वनविभागाने या नुकसानीची दखल घेतली नाही आणि आम्हाला न्याय दिला नाही, तर मला आत्मदहन करावे लागेल.”
​झटका मशीन देण्याची मागणी

रानडुकरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. शासनाने एकतर या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मुभा शेतकऱ्यांना द्यावी किंवा शेतीचे संरक्षण करण्यासाठी वनविभागामार्फत ‘झटका मशीन’चा पुरवठा करावा, जेणेकरून भविष्यातील नुकसान टाळता येईल, अशी मागणी घोटेघरमधील ग्रामस्थांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ;...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'तुमच्या घराचा...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

error: Content is protected !!