HomeजावळीPanchgani news : कावडी येथे रविवारी मान्यवर पुरुषांच्या उपस्थितीत महिला सन्मान सोहळा

Panchgani news : कावडी येथे रविवारी मान्यवर पुरुषांच्या उपस्थितीत महिला सन्मान सोहळा

पांचगणी न्यूज नेटवर्क /अजित जगताप
सातारा– जागतिक महिला दिनानिमित्त राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वतीने कावडी ता. जावली येथे रविवार दि. २९ मार्च रोजी दुपारी ४ वाजता मान्यवर पुरुषांच्या उपस्थितीमध्ये भव्य महिला सन्मान सोहळा होत आहे. ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र दीपक फटाक्यांची आतिषबाजी व ढोल ताशाच्या गजरात मान्यवर पुरुषांच्या उपस्थितीने महिला माता-भगिनींचा गौरव होणार आहे.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान, कावडी ग्रामपंचायत विकासाचा उत्सव आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या वतीने व हस्ते विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान सोहळा कावडी येथे होणार आहे. जावळी तालुक्यात अनेक माता-भगिनी महिला कर्तबगार आहेत. अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी नावलौकिक प्राप्त केलेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचे ही त्यांची वर्णी लागलेली आहे.
निसर्गरम्य जावळी तालुक्यातील कावडी या ठिकाणी

या सोहळ्याला ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह खासदार श्रीमंत छ. उदयनराजे भोसले, राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, वन अधिकारी अमोल सातपुते,माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले, माजी आ. सदाशिव सपकाळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. प्रियाताई शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, भाजप जावली तालुकाध्यक्ष संदीप परामणे, भाजपचे सर्व पदाधिकारी, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व आजी माजी पदाधिकारी, जावली पंचायत समितीचे सभापती सौरभ शिंदे, उप सभापती गोरख महाडिक, सर्व सदस्य, जावली तालुक्यातील सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्याला अभिनेत्री संजना काळे व अभिनेते संदीप पाठक यांच्या मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्याला सन्माननीय कर्तबगार महिलांचा सन्मान होत असल्याने सर्व माता-भगिनींमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे. त्यांच्यासाठी मंचकावर पुरुषप्रधान संस्कृती बाजूला ठेवून या सोहळ्यासाठी कर्तबगार महिलांना प्राधान्य द्यावे. अशी मागणी जावळी तालुक्यातील महिलांच्या वतीने करण्यात येत आहे. कावडी तालुका जावळी या ठिकाणी होणाऱ्या या या भव्यदिव्य पहिला सन्मान सोहळ्याला सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वसंतराव मानकुमरे यांनी केले आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून करहर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
___________________________________

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ;...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'तुमच्या घराचा...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

error: Content is protected !!