Homeमहाबळेश्वरPanchgani news : सातारा जिल्हा परिषद अपहरण नाट्य : अनिल देसाई, संदीप...

Panchgani news : सातारा जिल्हा परिषद अपहरण नाट्य : अनिल देसाई, संदीप मांडवे यांना जामीन मंजूर; पोलिसांच्या कार्यपद्धतीवर न्यायालयाचे ओढले कडक ताशेरे

पांचगणी न्यूज नेटवर्क 

महाबळेश्वर : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या धामधुमीत संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या कथित ‘अपहरण’ प्रकरणाला आज महाबळेश्वर न्यायालयाने महत्त्वाचे वळण दिले. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांचा जामीन अर्ज मंजूर करत न्यायालयाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे. विशेष म्हणजे, या सुनावणीदरम्यान न्यायालयाने पोलिसांच्या तपासातील त्रुटींवर बोट ठेवत आणि कार्यपद्धतीवर कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केल्याने पोलीस प्रशासनासह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ठोस पुराव्यांच्या अभावावरून न्यायालयाने ओढलेले ताशेरे पोलिसांसाठी मोठा धक्का मानले जात आहेत.

​हे संपूर्ण प्रकरण जिल्हा परिषदेच्या सत्तासंघर्षातून उभे राहिले होते. निवड प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर काही सदस्यांचे अपहरण झाल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला होता, ज्याचे पडसाद थेट राज्याच्या विधानसभेतही उमटले होते. या आरोपावरून पोलिसांनी अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेतले होते. मात्र, आजच्या सुनावणीत नाट्यमय घडामोड पाहायला मिळाली. ज्यांचे अपहरण झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता, ते दिनकर उर्फ बापूसाहेब शिंदे स्वतः न्यायालयात हजर झाले. त्यांचे प्रत्यक्ष दर्शन आणि यापूर्वी त्यांनी अपहरण झाले नसल्याबाबत दिलेला जबाब यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून प्रकरणातील संभ्रम अधिकच वाढला आहे.

​न्यायालयात दोन्ही बाजूंच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. संदीप मांडवे यांच्या वतीने अ‍ॅड. एस. एन. सनाप यांनी, तर अनिल देसाई यांच्या वतीने अ‍ॅड. शिवराज धनवडे आणि अ‍ॅड. श्रीपाद ढाणक यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन आणि पुराव्यांची कमतरता या मुद्द्यांकडे बचाव पक्षाने न्यायालयाचे लक्ष वेधले. सर्व बाजूंचा विचार केल्यानंतर न्यायालयाने पोलिसांच्या कारवाईत घाईगडबड झाल्याचे निरीक्षण नोंदवत दोन्ही सदस्यांना जामीन मुक्त करण्याचे आदेश दिले. या निकालानंतर देसाई आणि मांडवे समर्थकांनी न्यायालयाच्या आवारात जल्लोष केला असून, हा सत्याचा विजय असल्याची भावना व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ;...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'तुमच्या घराचा...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

error: Content is protected !!