HomeसाताराPanchgani news : सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनासाठी शिवसेना महिला मूकमोर्चा

Panchgani news : सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनासाठी शिवसेना महिला मूकमोर्चा

पांचगणी न्यूज नेटवर्क /अजित जगताप

सातारा : संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय झालेल्या सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष च्या निवडणुकीत झालेला गोंधळ आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांची जखम व भाजपची दादागिरी या विरोधात शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी आज मोर्चा काढला. या मोर्चाला सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाची जोरदार मागणी करण्यात आली. या मोर्चाला भाजप विरोधात शिवसेनेचा इतर महिला स्वयंस्फूर्तीने सहभागी झाल्या होत्या.

जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवड प्रक्रिया लोकशाही मार्गाने जाहीर करण्यात आली. परंतु या निवडणुकीशी संबंधित सातारा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्यासमोरच अपहरण नाट्य व राष्ट्रवादी जिल्हा परिषद सदस्यांना अटक सत्र आणि दबाव नाट्य झाले. घटनात्मक अधिकार असलेल्या महायुतीचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांना पोलिसांमार्फत भाजप पक्षातील एका गटाच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. एका गटाच्या कार्यकर्त्यांपेक्षाही सातारा पोलीस एका आदेशाने आक्रमक झाले होते. भाजपसाठी जिवाचे रान करणाऱ्या पोलिसांच्या मुळेच खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्याची बदनामी झालेली आहे. अशा सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना निलंबत करावे. साताऱ्यातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणाऱ्या लोकशाही मार्गाने शिक्षा व्हावी. अशा पद्धतीने महिला वर्गाने मागणी केली होती.

सातारा जिल्हा शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सातारा नगरपालिकेसमोर घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ते शिवतीर्थ पोवई नाका या ठिकाणी युगपुरुषांच्या विचारला अभिवादन केले. त्यानंतर शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी सातारा शहरातून मूक मोर्चा काढला.

शिवसेना व राष्ट्रवादी यांनी निवडणूक पूर्व युती जाहीर करून बहुमतासाठी आवश्यक ते ३७ संख्या बळ जुळवले होते. असे असताना भाजप विरोधकांनी बळाचा वापर करून प्रचंड दांडगाई केली. त्यादिवशी सातारा पोलिसांची भूमिका ही भाजप सत्ताधाऱ्यांना धार्जिणी किंबहुना घरगड्यासारखी वागल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हाताला जखम झाली. राष्ट्रवादीचे खा. नितीन पाटील व राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांना भाजप प्रेमी पोलिसांनी धक्काबुक्की झाल्याचा दुर्दैवी प्रकार घडला. या घटनेमुळे जिल्ह्याच्या पुरोगामी परंपरेला काळीमा फासला गेला आहे. जि. प. मधील गोंधळ नाट्याची न्यायालयीन चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी. सीसीटीव्ही फुटेज सर्वांसाठी खुले करून नक्की त्या दिवशी काय घडले? हे जनतेसमोर आणावे. सातारा जिल्हा परिषद नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड रद्द करून नव्याने फेर निवड घेण्यात यावी. संबंधित प्रकरणातील शासकीय स्तरावरील दोषी अधिकाऱ्यांच्या तत्काळ बडतर्फ करून त्यांच्या जागेवर कर्तव्यनिष्ठ वरिष्ठ पोलीस अधिकारी नेमावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सदर महामोर्चाला सातारा जिल्हातील जावळी तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य कविता ताई ओबळे , शिवसेना महिला उपाध्यक्ष सुलोचना चंद्रकांत पवार,वर्षाताई अरडे,विमलताई सुपणेकर,संध्याताई दाभाडे.प्रियांकाताई वाघमारे, प्रियांकाताई नलावडे,मेघाताई चोरगे,मोनिकाताई पवारविद्याताई घाडगे,नंदिनी ताई गायकवाड,सुनीता फाळके ,सुजाता गायकवाड अर्चनाताई जाधव,विद्याताई वायदंडे मंजिरी सावंत ,मिनाक्षी मोरे ,कांचन गौरी शिंदे,सविता राठोड, रोजीया शेख,सुजाता राठोड,शांताबाई ओंबळे,नीता ओंबळे,कविता हौसाबाई सुतार,उषा उंबरकर,पार्वती ओंबळे,आनंदी जुनघरे,वैष्णवी धनवडे,वनिता ओंबळे आणि इतर जिल्हातील शिवसैनिक, महिला पदाधिकारी तसेच होते. या मोर्चाला जावळी पाटण कोरेगाव महाबळेश्वर सातारा कराड खंडाळा खटाव तालुक्यातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ;...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'तुमच्या घराचा...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

error: Content is protected !!