Homeमहाबळेश्वरPanchgnai news: महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानची नवी मुंबईत वैचारिक बैठक; विकासकामांचा आढावा घेत...

Panchgnai news: महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानची नवी मुंबईत वैचारिक बैठक; विकासकामांचा आढावा घेत मकरंद आबांना पाठिंब्याचा निर्धार!

पाचगणी न्यूज नेटवर्क
नवी मुंबई/महाबळेश्वर : महाबळेश्वर आणि जावली तालुक्यातील मूळ रहिवासी जे मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पनवेल विभागात स्थायिक झाले आहेत, त्यांच्या उन्नतीसाठी आणि विचारांच्या देवाण-घेवाणीसाठी ‘महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठान’च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि सभासदांची महत्त्वपूर्ण वैचारिक बैठक वाशी, नवी मुंबई येथील कांदा बटाटा मार्केटमध्ये नुकतीच संपन्न झाली.

आमशी गावचे ज्येष्ठ नागरिक आणि प्रतिष्ठानचे मार्गदर्शक श्रीरंग मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. या बैठकीत महाबळेश्वर-जावली तालुक्यातील प्रत्येक गावातील विकासकामांसंदर्भात सखोल विचार विनिमय करण्यात आला.

प्रतिष्ठानने आजवर राबवलेले सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, सहकारी, कृषी, अध्यात्मिक तसेच इतर विविध विधायक उपक्रम आणि कार्यक्रमांचा यावेळी आढावा घेण्यात आला. भविष्यात प्रतिष्ठानचे कार्य अधिक प्रभावीपणे चालवण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, यावर उपस्थितांनी सविस्तर चर्चा केली.

वाई, महाबळेश्वर, खंडाळा तालुक्याचे स्थानिक आमदार आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी आपापल्या गावांमध्ये केलेल्या विकासकामांचा आढावाही यावेळी घेण्यात आला. या विकास कामांच्या अनुषंगाने, महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानच्या पदाधिकारी आणि सभासदांनी मकरंद आबा पाटील यांच्या पाठीशी ठामपणे पाठबळ देण्याचा निर्णय एकमताने निश्चित केला.
यावेळी बैठकीला उपस्थित असणाऱ्या प्रत्येक गावातील प्रतिनिधींनी आपापले महत्त्वपूर्ण विचार मांडले.

प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष राजेंद्र मोरे, सचिव रमेश संकपाळ सर, संघटक विष्णु शिंदे सर, सल्लागार गोविंदशेठ शिंदे, आनंदा सकपाळ, बापू कदम, संतोष कदम, राजू शिंदे, गोविंद भोसले आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
बैठकीच्या यशस्वी समाप्तीनंतर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष राजेंद्र मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. उपस्थितांसाठी चहापाणी व बैठक व्यवस्था नारायण शिंदे, संतोष संकपाळ, संजय मोरे आणि राजेश देसाई यांच्या सौजन्याने करण्यात आली होती. महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानच्या माध्यमातून मुंबईकर रहिवासी आपल्या मातीशी जोडले राहून विधायक कार्य करण्यास कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : शिवजयंतीचे औचित्य साधून गोडवलीत ‘सुभेदार’ शिष्यवृत्तीचा झंझावात; विद्यार्थिनीला लॅपटॉप आणि ग्रंथराज...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पांचगणी : किल्ले प्रतापगडाच्या छायेत वसलेल्या गोडवली (ता. महाबळेश्वर) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती केवळ पारंपरिक पद्धतीने साजरी न करता,...

Panchgani news : गोडवलीत शिवजयंतीनिमित्त ‘खेळ पैठणीचा’, संगीता संजय मालुसरे ठरल्या विजेत्या : रक्तदान...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : गोडवली (ता. महाबळेश्वर) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे कला क्रीडा मंडळाच्या वतीने...

Panchgani news : महाबळेश्वरमध्ये खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी उघड; डोंबिवलीच्या आरोपीला वनविभागाकडून बेड्या

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​महाबळेश्वर : पर्यटननगरी महाबळेश्वरमध्ये वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी करण्याचा मोठा प्रयत्न वनविभागाच्या सतर्कतेमुळे उधळून लावला आहे. दुर्मिळ असलेल्या खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करण्यासाठी...

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ;...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'तुमच्या घराचा...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

error: Content is protected !!