Homeमहाबळेश्वरबी एस एन एल. कंपनीने कोलमडलेल्या सेवेचे आपले टॉवर व यंत्रणा काढून...

बी एस एन एल. कंपनीने कोलमडलेल्या सेवेचे आपले टॉवर व यंत्रणा काढून न्यावी : शिंदी व कळमगाव सह कांदाटी खोऱ्यातील नागरिकांची मागणी ; जनता संतप्त

पांचगणी न्यूज नेटवर्क
महाबळेश्वर: महाबळेश्वर तालुक्यातील एकमेव दुर्गम भाग असलेल्या कांदाटी विभागातील बी एस एन एल.सेवा गेली महिनाभरापासून कोलमडली असून ऐन पावसाळ्यात संपर्क सेवा बंद असल्याने लोकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ही सेवा तातडीने पूर्ववत सुरू करावी अन्यथा त्यांचे टॉवर काढून न्यावेत अशी मागणी शिंदी येथील सामाजिक कार्यकर्ते सौरभ मोरे यांनी विभागाच्या वतीने केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम अशा कोयना, कांदाटी , सोळशी विभागात बी एस एन एल सेवा कोमात गेली आहे. याबाबत येथील नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सेवा सुरळीत ठेवायची नसेल तर असून अडचण आणि नसून खोळंबा ठरणारी आपली सर्व यंत्रणा तातडीने हलवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

याबाबत कळमगांवचे सरपंच अनिल हिरवे यांनी सांगितले. आम्ही कोयनेचे राहणारे ग्रामस्थ पूर्वी आमच्याकडे फोन नव्हते त्यानंतर लोकांनी साधे फोन घेतले. नंतर लोकांना बाहुलं दाखवण्यासाठी बीएसएनएल ऑफिसने गावागावांमध्ये बुजगावणे असणारे टॉवर उभे केले. परंतु महिना महिना रेंज नसेल तर लोकांनी 500 रुपयाचे रिचार्ज मारून काय फायदा ? त्याच्यासाठी या विभागातील सर्व कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन बीएसएनएल टॉवर बंद करावेत.
कोट्रोशी, कळमगाव, देवळी, झांजवड या गावांना कित्येक दिवस रेंज नाही पाऊस चालू झाला आहे कुठे काही दुर्घटना घडली तर लोकांनी कोणाशी संपर्क साधायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बी एस एन एल कंपनीने आपली यंत्रणा तातडीने चालू करावी अन्यथा ती बंद करावी अशी ही मागणी शेवटी सरपंच अनिल हिरवे यांनी केली आहे.
मुसळधार पावसात ही सेवा बंद पडल्याने दुर्गम भागातील जनतेला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. लोकप्रतिनिधींनी वरिष्ठ पातळीवरून याचा कायमचा छडा लावावा अशी मागणी या या विभागातील नागरिकांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ;...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'तुमच्या घराचा...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

error: Content is protected !!