Homeमहाबळेश्वरमहाबळेश्वर तालुक्यातील ११३ शाळांमधील २४८६ विद्यार्थ्यांना 'उर्मी' च्या वतीने रेनकोटचे वितरण

महाबळेश्वर तालुक्यातील ११३ शाळांमधील २४८६ विद्यार्थ्यांना ‘उर्मी’ च्या वतीने रेनकोटचे वितरण

पांचगणी न्यूज नेटवर्क 

महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या ११३ शाळांमधील २४८६ विद्यार्थ्यांना ‘उर्मी’ सामाजिक संस्थेच्यावतीने ‘हिसोवा इलेक्ट्रॉनिक्स प्रा.लि. विवो पुणे’ यांचेमार्फत रेनकोटचे वितरण भेकवली व मेटगुताड येथे प्रातिनिधिक स्वरुपात करणेत आले तत्प्रसंगी वाईचे प्रातांधिकारी राजेंद्र कचरे, महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील, गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, उर्मी सामाजिक संस्थेचे समन्वयक राहूल शेंडे तसेच त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते..

भेकवली येथे ‘धरती आबा’ जनभागीदारी अभियानांतर्गत कार्यक्रम प्रसंगी बोलताना प्रांताधिकारी राजेंद्र कचरे म्हणाले,”महाबळेश्वर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाचे सुरु असलेले काम निश्चितच कौतुकास्पद असून दुर्गम भागातील विद्यार्थी उत्तमप्रकारे ज्ञान संपादन आहेत, यासाठी पालक आणि शिक्षकांबरोबर उर्मी सारख्या सामाजिक संस्थांचे योगदान सुध्दा अत्यंत महत्वाचे आहे” तसेच तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांनी मोठ्याप्रमाणात घ्यावा असे आवाहन केले..

महाबळेश्वर तालुका अतिवृष्टीचा म्हणून सर्वदूर परिचित असून शालेय विद्यार्थ्यांना पावसाळ्यामध्ये शाळेमध्ये जाता-येता अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते..विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये ‘शिकणे’ प्रक्रियेत कोणताही अडथळा येवू नये आणि त्यांचे अध्ययन अधिक सुकर व्हावे, या उदात्त हेतूने तालुक्यातील सर्वच विद्यार्थ्यांना विवो व उर्मी संस्थेच्या माध्यमातून झालेली मदत खूप मोलाची आहे, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे यांनी केले.

सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना रेनकोटबरोबर पाण्याची बाटली, पुस्तके, गणवेश व लेखन साहित्याचे वितरण करणेत आले..

 कार्यक्रमास शिक्षण विस्तार अधिकारी सुरेंद्र भिलारे, केंद्रप्रमुख दगडू ढेबे, संजय पारठे, नामदेव धनावडे, चंद्रकांत जंगम, विनायक पवार, जयराज जाधव, सुहास कुलकर्णी उपस्थित होते तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष शिक्षक अभिजीत खामकर, सचिन चव्हाण, कुलदीप अहिवळे, श्रीनिधी जोशी, पूनम घुगे, रमेश सरक, श्रीगणेश शेंडे, उमेश भोसले यांनी परिश्रम घेतले..सर्व उपस्थितांचे स्वागत दगडू ढेबे यांनी केले तर आभार सुरेंद्र भिलारे यांनी मानले, कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ;...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'तुमच्या घराचा...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

error: Content is protected !!