HomeपांचगणीPanchgani news : राजकीय आणि अभिनयाचा अनोखा संगम: मंत्री मकरंद आबा पाटील...

Panchgani news : राजकीय आणि अभिनयाचा अनोखा संगम: मंत्री मकरंद आबा पाटील यांची अमीर खान यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

पाचगणी न्यूज नेटवर्क 

पांचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेले पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण सध्या एका विशेष भेटीमुळे चर्चेत आले आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकाऱ्यांसह बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्टनिस्ट’ अमीर खान याच्या पाचगणी येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीमुळे राजकीय आणि कला क्षेत्रातील दिग्गज एकाच छताखाली आल्याचे पाहायला मिळाले.

​अमीर खान यांचे पाचगणीशी असलेले नाते अत्यंत जुने आणि जिव्हाळ्याचे आहे. त्यांचे लग्नही याच ठिकाणी झाले असून, तेव्हापासून ते स्वतःला ‘पाचगणीकर’ मानतात. धावपळीच्या आयुष्यातून विरंगुळा मिळवण्यासाठी अमीर खान अनेकदा आपल्या पाचगणीतील घरी मुक्कासाला येतात. यावेळी मंत्री मकरंद आबा पाटील यांनी त्यांची भेट घेतली असता, कला, सामाजिक प्रश्न आणि सध्याच्या समकालीन विषयांवर दोघांमध्ये मनमोकळी चर्चा झाली.

  • ​या भेटीदरम्यान केवळ गप्पाच रंगल्या नाहीत, तर समाजकारणात कलेचे महत्त्व आणि ग्रामीण विकासातील योगदानावरही विचारमंथन झाले. या प्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, प्रवीणशेठ भिलारे, तहसीलदार सचिन म्हस्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, नियोजन समिती सदस्य प्रवीणशेठ भिलारे आणि नवनिर्वाचित नगरसेवक राजेंद्र पारठे यांची प्रमुख उपस्थिती होती. विशेष म्हणजे ‘लगान’ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते अमीन हाजी यांनीही या चर्चेत सहभाग घेतला, ज्यामुळे या बैठकीला एक वेगळीच उंची प्राप्त झाली.

​मंत्री पाटील यांनी अमीर खान यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले, तर अमीर खान यांनीही पाचगणीच्या निसर्गरम्य वातावरणाबद्दल आणि इथल्या लोकांशी असलेल्या आपल्या ऋणानुबंधांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. राजकीय क्षेत्रातील संवेदनशीलता आणि कला क्षेत्रातील सर्जनशीलता यांचा हा मिलाफ उपस्थित मान्यवरांसाठी आणि स्थानिक नागरिकांसाठी आकर्षणाचा विषय ठरला. ही सदिच्छा भेट आगामी काळात कला आणि समाजकारणाच्या दृष्टीने सकारात्मक ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ;...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'तुमच्या घराचा...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

error: Content is protected !!