HomeपांचगणीPanchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक कारवाई

पांचगणी न्यूज नेटवर्क 

पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई केली आहे. मालुसरे याला सातारा जिल्ह्यातून पुढील दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी, वाई यांनी नुकतेच पारित केले आहेत.

भरत मालुसरे याच्यावर पाचगणी पोलीस ठाण्यात शरीराविरुद्ध आणि मालाविरुद्धचे अनेक गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे गोडवली आणि खिंगर परिसरातील नागरिक दहशतीखाली वावरत होते. सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुरक्षित आणि विनाविघ्न चालावे, यासाठी पाचगणी पोलिसांनी त्याच्या हद्दपारीचा ठोस प्रस्ताव पोलीस अधीक्षक, सातारा यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाची वाई विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमार्फत कायदेशीर पडताळणी व साक्षीदारांची तपासणी पूर्ण केल्यानंतर तो पुढील निर्णयासाठी उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आला होता.

उपविभागीय दंडाधिकारी श्री. योगेश खरमाटे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आदेश क्रमांक एमएजी/हद्दपार/एसआर ०६/२०२५ अन्वये भरत मालुसरे याला सातारा जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, सार्वजनिक शांतता बिघडवणाऱ्या इतर काही इसमांविरुद्धही हद्दपारीचे प्रस्ताव विचाराधीन असून नागरिकांनी कोणत्याही भीतीशिवाय तक्रारी नोंदवण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ही यशस्वी कारवाई सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचगणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक बालाजी सोनुने व पोलीस हवालदार श्रीकांत कांबळे यांनी पार पाडली. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी यांनी संपूर्ण टीमचे विशेष अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

Panchgani news : शेतकऱ्यांनो, सातबाऱ्यावरील चुका आता चुटकीसरशी होणार दुरुस्त; महाबळेश्वर तालुक्यात विशेष ‘महाराजस्व...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​महाबळेश्वर : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाच्या नवीन धोरणानुसार, 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियानाचा टप्पा आता महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या उत्साहात...

Panchgani news : जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आंब्रळ गावचा सुपुत्र हर्ष चिटणीस ‘सीबीएसई’ परीक्षेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क /प्रमोद रांजणे ​पाचगणी: प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची जिद्द आणि मेहनतीची तयारी असली की यश नक्कीच साध्य करता येते, याचा प्रत्यय आंब्रळ...

error: Content is protected !!