HomeपांचगणीPanchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार 'शिवसृष्टी'शिवभक्त...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त उद्या रविवार, दि. १९ एप्रिल रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शहरात भव्य आणि लक्षवेधी शाही मिरवणूक काढण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी पाचगणीतील मुख्य बाजारपेठ भगव्या ध्वजांनी नटली असून संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या शाही मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये केवळ पाचगणी शहरच नव्हे, तर परिसरातील खिंगर, आंब्रळ, गोडवली, राजपुरी, दांडेघर, गणेश पेठ, भोसे, भिलार, शाहूनगर आणि पांगारी या ग्रामीण भागातील शिवप्रेमी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. फुलांनी सजवलेला शिवरायांचा पालखी सोहळा, पारंपारिक ढोल-ताशांचा गजर आणि शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके यामुळे पाचगणीत अक्षरशः शिवसृष्टी अवतरणार आहे.

​शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या आणि स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. विशेषतः तरुण वर्गामध्ये या उत्सवाबाबत मोठा उत्साह असून, शिस्तबद्ध पद्धतीने आणि पारंपरिक वेशभूषेत शिवभक्त या शोभयात्रेत सामील होणार आहेत.
​उद्या सायंकाळी निघणाऱ्या या मिरवणुकीने पाचगणीचा आसमंत भगवामय होणार असून, या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी पर्यटकांसह स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या वतीनेही वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीने चोख नियोजन करण्यात आले आहे. सर्व शिवप्रेमींनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

Panchgani news : शेतकऱ्यांनो, सातबाऱ्यावरील चुका आता चुटकीसरशी होणार दुरुस्त; महाबळेश्वर तालुक्यात विशेष ‘महाराजस्व...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​महाबळेश्वर : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाच्या नवीन धोरणानुसार, 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियानाचा टप्पा आता महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या उत्साहात...

Panchgani news : जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आंब्रळ गावचा सुपुत्र हर्ष चिटणीस ‘सीबीएसई’ परीक्षेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क /प्रमोद रांजणे ​पाचगणी: प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची जिद्द आणि मेहनतीची तयारी असली की यश नक्कीच साध्य करता येते, याचा प्रत्यय आंब्रळ...

error: Content is protected !!