HomeपांचगणीPanchgani news : गोडवलीत शिवजयंतीनिमित्त 'खेळ पैठणीचा', संगीता संजय मालुसरे ठरल्या विजेत्या...

Panchgani news : गोडवलीत शिवजयंतीनिमित्त ‘खेळ पैठणीचा’, संगीता संजय मालुसरे ठरल्या विजेत्या : रक्तदान शिबिराचा उत्साह; ४० दात्यांचे रक्तदान

पांचगणी न्यूज नेटवर्क
​पाचगणी : गोडवली (ता. महाबळेश्वर) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे कला क्रीडा मंडळाच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विशेषतः महिलांसाठी आयोजित केलेला ‘होम मिनिस्टर’ (खेळ पैठणीचा) कार्यक्रम आणि रक्तदान शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
​कार्यक्रमाची सुरुवात शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन आणि भव्य मिरवणुकीने करण्यात आली. यानंतर राबविण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमांनी संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतले.

​शिवजयंतीनिमित्त गावातील महिलांसाठी विशेष ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत महिलांनी मोठ्या संख्येने आणि उत्साहाने सहभाग नोंदवला. उखाणे, पारंपरिक खेळ आणि विविध स्पर्धांमुळे कार्यक्रमात मोठी रंगत आली. दैनंदिन कामातून विरंगुळा आणि एकीची भावना वाढीस लावणारा हा उपक्रम महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करून गेला. या स्पर्धेत विजेत्या ठरल्या त्या संगीता संजय मालुसरे यातील इतर विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

​’शिवजयंती उत्सवातून समाजहित’ हा विचार डोळ्यासमोर ठेवून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ४० रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली. याच बरोबर आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात ७० हून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे, यावेळी पाळीव प्राण्यांच्या आरोग्य तपासणीचाही आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.

​याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष योगेश मालुसरे, दीपक मालुसरे, तेजस मालुसरे यांच्यासह मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. केवळ मिरवणुका न काढता अशा सामाजिक उपक्रमांतून शिवजयंती साजरी केल्याबद्दल परिसरातील नागरिकांकडून या मंडळाचे विशेष कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : शिवजयंतीचे औचित्य साधून गोडवलीत ‘सुभेदार’ शिष्यवृत्तीचा झंझावात; विद्यार्थिनीला लॅपटॉप आणि ग्रंथराज...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पांचगणी : किल्ले प्रतापगडाच्या छायेत वसलेल्या गोडवली (ता. महाबळेश्वर) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती केवळ पारंपरिक पद्धतीने साजरी न करता,...

Panchgani news : महाबळेश्वरमध्ये खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी उघड; डोंबिवलीच्या आरोपीला वनविभागाकडून बेड्या

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​महाबळेश्वर : पर्यटननगरी महाबळेश्वरमध्ये वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी करण्याचा मोठा प्रयत्न वनविभागाच्या सतर्कतेमुळे उधळून लावला आहे. दुर्मिळ असलेल्या खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करण्यासाठी...

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ;...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'तुमच्या घराचा...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

error: Content is protected !!