पाचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा. ना. मकरंद आबा पाटील यांच्या पुढाकाराने राज्याचे वनमंत्री मा. ना. गणेशजी नाईक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह मुंबई या ठिकाणी मिटिंग आयोजित केली होती.
या बैठकीसाठी जिल्हाधिकारी ठाणे, वन उपसंचालक ठाणे, वन उपसंचालक सातारा व संबंधित विभागाचे सर्वाधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे आकल्पे गावचे सरपंच मा. संतोष आखाडे व मोठ्या प्रमाणावर प्रकल्पग्रस्त या बैठकीत उपस्थित होते.
या बैठकीमध्ये पाचगाव भिवंडी येथे पुनर्वसन झालेल्या 120 प्रकल्प बाधित खातेदारांनी पुन्हा आपल्या मूळ गावी म्हणजे सातारा या ठिकाणी फेर पुनर्वसन करण्याची मागणी केली व भिवंडी ठाणे येथे राहण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे दोन्ही मंत्री महोद्यांनी सदर खातेदारांचे पुनर्वसन सातारा जिल्ह्यांमध्ये करण्याच्या सूचना संबंधित वन विभागाला दिले आहेत.
या बैठकीमुळे आनंदित झालेल्या प्रकल्पग्रस्त खातेदारांकडून मा. ना. मकरंद आबा पाटील यांचे आभार मानले. तसेच, या संपूर्ण प्रकरणात जातीने लक्ष घालून ही मिटींग आयोजित करण्यात महाबळेश्वर तालुक्यांचे लोकनेते, सहकाररत्न मा. राजेंद्र शेठ राजपुरे यांचे मोलाचे योगदान असल्याचे प्रकल्पग्रस्त यांनी सांगितले आणि मा. राजेंद्र शेठ राजपुरे यांच्या आभार व्यक्त केले.
























