HomeपांचगणीPanchgani news: पाचगणी नगरपालिकेच्या रिंगणात रोमांच! लक्ष्मी कऱ्हाडकरांचा उमेदवारी अर्ज वैध; कऱ्हाडकर...

Panchgani news: पाचगणी नगरपालिकेच्या रिंगणात रोमांच! लक्ष्मी कऱ्हाडकरांचा उमेदवारी अर्ज वैध; कऱ्हाडकर गटाची आतषबाजी! अनिता चोपडे यांची हरकत फेटाळली , कराडकरानी केला आनंद व्यक्त

पाचगणी न्यूज नेटवर्क

पाचगणी: पाचगणी नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ७ मध्ये आज छाननी प्रक्रियेदरम्यान मोठा राजकीय ड्रामा पाहायला मिळाला. माजी नगराध्यक्ष लक्ष्मीताई कऱ्हाडकर यांच्या उमेदवारी अर्जावर माजी नगराध्यक्ष अनिता चोपडे यांनी आक्षेप घेत थेट जात वैधता प्रमाणपत्राला आव्हान दिले. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत जाधव आणि मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे व कायदेशीर बाबी तपासल्यानंतर कऱ्हाडकर यांच्या बाजूने निकाल दिला आणि त्यांचे नामनिर्देशनपत्र वैध ठरवले. या निर्णयानंतर कऱ्हाडकर गटाने पाचगणीत सायंकाळी जोरदार फटाक्यांची आतषबाजी करत आपला आनंद व्यक्त केला.

अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स

​अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही पाचगणीच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. प्रभाग क्रमांक ७ (ओबीसी आरक्षण) मधून लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी आपला अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात कोण उभे राहणार, याबद्दल शेवटपर्यंत उत्सुकता होती. अखेरच्या टप्प्यात ना. मकरंद आबा पाटील गटाने अनिता चोपडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. चोपडे यांनी कऱ्हाडकर यांना आव्हान देण्याच्या उद्देशाने अर्ज भरल्याचे स्पष्ट झाल्यावर, कऱ्हाडकर यांनीही सावध पवित्रा घेत प्रभाग क्रमांक ८ मधून आपला दुसरा पर्यायी अर्ज दाखल केला. कऱ्हाडकर यांनी दोन अर्ज दाखल केल्याने शहरात दिवसभर जोरदार चर्चांना उधाण आले होते.

जात वैधता प्रमाणपत्रावर आक्षेप, अखेर युक्तिवाद फेटाळला

​आज छाननीच्या वेळी अनिता चोपडे यांनी कऱ्हाडकर यांच्या अर्जावर गंभीर आक्षेप नोंदवत त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्रावर हरकत घेतली. यावर दोन्ही बाजूच्या वकिलांनी कसून युक्तिवाद केला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियम आणि अटींच्या आधारे विचारविनिमय करून सौ. चोपडे यांनी घेतलेली हरकत फेटाळली आणि लक्ष्मी कऱ्हाडकर यांचा उमेदवारी अर्ज संपूर्णपणे वैध ठरवला.

​निकाल लागताच विजयाचा जल्लोष

​हा निकाल जाहीर होताच लक्ष्मी कऱ्हाडकर यांच्या कार्यकर्त्यांनी पाचगणी शहरात फटाक्यांची आतषबाजी करून निवडणुकीपूर्वीच जणू आपला विजय साजरा केला. कऱ्हाडकर यांनी यानंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपला आनंद द्विगुणित केला.

राजकीय समीकरणे स्पष्ट: नगराध्यक्षपदाचे उमेदवार कऱ्हाडकरांच्या मदतीला

आज दिवसभर छाननी सुरू असताना निकाल लागेपर्यंत माजी नगराध्यक्ष लक्ष्मी कऱ्हाडकर ह्या पालिकेत थांबून होत्या. विशेष म्हणजे, त्यांच्यासोबत नगराध्यक्षपदाचे उमेदवार संतोष कांबळे हे देखील ठामपणे उपस्थित होते. यामुळे, लक्ष्मी कऱ्हाडकर यांना संतोष कांबळे यांचेच खंबीर समर्थन असल्याचे राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ;...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'तुमच्या घराचा...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

error: Content is protected !!