HomeपांचगणीPanchgani news: पाचगणी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज २३ अर्ज दाखल ; आजपर्यंत एकूण...

Panchgani news: पाचगणी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज २३ अर्ज दाखल ; आजपर्यंत एकूण ९३ अर्ज दाखल ; उद्या अखेरच्या दिवशी संख्या वाढवण्याची शक्यता

पाचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी, तारीख.१६ : पाचगणी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या आज सातव्या दिवशी तब्बल २३ अर्ज दाखल झाले असून यामध्ये नगरसेवक पदाकरीता २२ अर्ज तर नगराध्यक्ष पदाकरीता १ अर्ज दाखल झाला आहे. तर आजपर्यंत एकूण अर्जांची संख्या ९३ वर पोहचली आहे. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे.

उद्या मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता असून आजपर्यंत सर्व अर्ज अपक्ष म्हणून भरले असून केवळ एक अर्ज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून भरला आहे तर उद्या भाजपकडून पक्षाचे वतीने अर्ज भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रणांगणातील राजकीय धुमश्चक्री स्पष्ट होईल असा अंदाज आहे.

पाचगणी नगरपरिषदेकरिता प्रभागनिहाय अर्ज दाखल झालेले पुढील प्रमाणे आहेत. यामध्ये आजअखेर नगराध्यक्ष पदाकरीता एकूण ९ अर्ज दाखल झाले असून नगरसेवक पदाकरीता ८४ अर्ज दाखल झाले आहेत.
आज प्रभाग क्रमांक १ (ब ) सर्वसाधारण महिला मधून राजश्री सणस, प्रभाग २ (अ ) अनुसूचित जाती महिला सोनल घाडगे, व सुप्रिया माने, प्रभाग ३ (अ) अनुसूचित जाती रुपेश बगाडे, आकाश बगाडे, (ब) सर्वसाधारण महिला प्रियंका जाधव, आशा बगाडे, विमल भिलारे, प्रभाग ४ (अ ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला नम्रता बोधे दोन अर्ज भरले, (ब) सर्वसाधारण शेखर कासुर्डे, प्रभाग ५ (अ ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला शिल्पा माने दोन अर्ज भरले,( ब ) सर्वसाधारण सुनील बिरामणे, प्रभाग ८ (अ ) अनुसूचित जाती सचिन मोरे, व किरण रणपिसे, प्रभाग ९ (अ ) अनुसूचित जाती महिला सरोज कांबळे, (ब ) सर्वसाधारण रंजन कांबळे, प्रभाग १० (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महेश खांडके दोन अर्ज, दिलावर बागवान, (ब) महिला सर्वसाधारण महिला शशिकला कासुर्डे, अनुसूचित जाती आरक्षण नगराध्यक्ष पदाच्या प्रवर्गातून नगराध्यक्षपदासाठी अमोल सावंत,यांनी अर्ज दाखल केला आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या अखेरचा दिवस असून उद्या दाखल होणाऱ्या अर्जांची स्थिती स्पष्ट होईल तर निवडणूक रिंगणातील लढती कशा लढल्या जातील ते अधिक स्पष्ट होईल.

चौकट : प्रामुख्याने पाचगणी नगरपरिषदेची निवडणूक अपक्ष पद्धतीने लढली जाते. येथे पक्षीय निवडणूक आतापर्यंत यशस्वी झालेली नाही. तर उद्या भाजप पाचगणी नगरपरिषदेच्या निवडणुकीत पूर्ण पूर्ण ताकतीने उतरणार असल्याचे बोलले जात होते. मात्र अद्यापि तसे निदर्शनास आलेले नाही. उद्या अखेरच्या दिवशी भाजप काय निर्णय घेते हे स्पष्ट होईल…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ;...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'तुमच्या घराचा...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

error: Content is protected !!