पाचगणी न्यूज नेटवर्क
पाचगणी : पाचगणी नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगतदार स्थितीत आली असून २० जागांसाठी तब्बल १२९ अर्ज दाखल झाल्याने निवडणूक चुरशीची होणार ही निश्चित झाले आहे. आज पालिका सभागृहात अर्जाची छाननी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षपदासाठी १२ तर नगरसेवकपदासाठी ११६ नामनिर्देशापत्रे पात्र ठरली. त्यामुळे अध्यक्षपदासाठी आता ८ उमेदवार रिंगणात उरले आहेत. त्यामुळे अध्यक्षपदासाठी बहुरंगी लढत रंगणार आहे.
या निवडणुकीत पाचगणीतील १० प्रभागातील २० जागांसाठी ऐकून ७८ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी दुरंगी , तिरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी लढती होणार असे चित्र निर्माण झाले आहे. छाननी दरम्यान एका उमेदवाराने प्रतिस्पर्धी उमेदवारी अर्जावर हरकत घेतल्याने याचा निकाल लावण्यासाठी वेळ लागल्याने सायंकाळी उशिरा निकाल लागला.
आज प्रभागात उरलेले अर्ज
प्रभाग 1 – अ) किरण जानकर, वैभव कऱ्हाडकर, पारस परदेशी ,संतोष कदम , ब )प्रतिभा धनावडे , प्रतीक्षा कासुर्डे, राजश्री सणस,
प्रभाग 2 अ) सुप्रिया माने, रेणुका कांबळे,सोनल घाडगे, ब) सुलभा लोखंडे, नरेंद्र बिरामणे,हरीश गोळे
प्रभाग 3 अ ) आकाश बगाडे, रुपेश बगाडे,अजय सपकाळ, विवेक परिहार, ब) अशा बगाडे, उषा भोसले, विमल भिलारे, आरती साळुंखे, प्रियांका जाधव, प्रीती आंब्राळे (शिवसेना)
प्रभाग 4 अ) परवीन मेमन, नम्रता बोधे
ब ) शेखर कासुर्डे, मंगेश उपाध्याय
प्रभाग 5 अ) उज्वला महाडिक, गायत्री कासुर्डे, राजश्री प्रभाळे, रेखा जानकर, शिल्पा माने, मेघना बाचल (bjp)
ब) सुनील बिरामने,अजित कासुर्डे, शहानवाज चौधरी, प्रसाद कारंजकर
प्रभाग 6 अ) माधुरी कासुर्डे,साधना कासुर्डे, प्रतीक्षा कासुर्डे, प्रियांका जायगुडे
ब ) गणेश कासुर्डे, भूषण बोधे, विनोद बिरामणे
प्रभाग 7 अ) लक्ष्मी कराडकर, अनिता चोपडे, नम्रता बोधे (भाजप) ब )राजेंद्र पारठे, प्रवीण बोधे
प्रभाग 8 अ) सचिन मोरे, नरेश लोहारा ,अमित कांबळे, सुनील खरात, किरण रणपिसे, रविराज देखणे, ब) अभिलाषा कराडकर, प्रीती पिसाळ, लक्ष्मी कराडकर, साबेरा सय्यद, रीना कांबळे
प्रभाग 9 अ)स्वाती कांबळे, आशा वन्ने, सुषमा मोरे,सरोज कांबळे, करुणा काकडे, सुचित्रा आव्हाडे,
ब ) प्रकाश गोळे, अर्जुन जेधे, जॉन जोसेफ ,रंजन कांबळे, हेन्री जोसेफ
प्रभाग 10 अ) योगेश जानकर, महेश खांडके, दिलावर बागवान, नामदेव चोपडे, ब ) शशिकला कासुर्डे, अमृता प्रकाश गोळे हे अर्ज वैद्य ठरले आहेत.
दुरंगी लढती..
प्रभाग 7 अ मध्ये माजी नगराध्यक्षा लक्ष्मी कराडकर व माजी नगराध्यक्षा अनिता चोपडे यांच्यात दुरंगी हाय हॉल्टेज लढत होत आहे. प्रभाग क्रमांक ४ मध्ये शेखर कासुर्डे आणि भाजपचे मंगेश उपाध्याय यांच्यात आणि ब गटात परवीन मेमन आणि भाजपच्या नम्रता बोधे प्रभाग ७ मध्ये प्रवीण बोधे आणि राजेंद्र पारठे यांच्यात, प्रभाग क्रमांक १० मध्ये अमृता गोळे आणि शशिकला कासुर्डे यांच्यामध्ये दुरंगी लढती होतील.
तिरंगी लढती…..
क्रमांक ३ मध्ये माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र बिरामने, हरीश गोळे आणि माजी उपनगराध्यक्ष सुलभा लोखंडे यांच्यात तिरंगी लढत होणार असून यामध्ये बिरामणे आणि गोळे यांच्या लढतीत सुलभा लोखंडे कशा सामना करतात यावर या लढतीचे चित्र अवलंबून आहे.
प्रभाग ६ ब मध्ये गणेश कासुर्डे, भूषण बोधे आणि माजी नगरसेवक विनोद बिरामणे यांच्यात अटीतटीची तिरंगी लढत होणार आहे
प्रभाग क्रमांक १ मध्ये दुसऱ्या लढतीत राजश्री सणस, प्रतिभा धनावडे आणि प्रतीक्षा कासुर्डे यांच्यात अटीतटीची तिरंगी लढत होत आहे. यामध्ये कोण बाजी मारणार हे आताच सांगणे कठीण आहे.
प्रभाग 2 अ मध्ये सुप्रिया माने, रेणुका कांबळे,सोनल घाडगे या नवख्या उमेदवारांमध्ये तिरंगी लढत रंगणार आहे.
चौकट : आज हेन्री जोसेफ यांनी शरद पवार राष्ट्रवादी गटाकडून भरलेला अर्ज एबी फॉर्म अभावी अवैध ठरला तर सुप्रिया माने यांनी भरलेल्या अर्जांपैकी एक अर्ज एकाच सूचकांच्या सह्या असल्याने अवैध्य ठरवण्यात आला.हे दोन अर्ज अवैध्य ठरले.
























