HomeपांचगणीPanchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून 'डंक' असणाऱ्या रूमची भिंत...

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ; मजुरांच्या मदतीने भिंती केल्या जमीनदोस्त

पांचगणी न्यूज नेटवर्क
​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. ‘तुमच्या घराचा कोपरा आमच्या हद्दीत येतो’ असा दावा करत, विरोधकांनी मजुरांच्या मदतीने चक्क भिंत पाडून मोठे नुकसान केले आहे. याप्रकरणी पाचगणी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पांचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार शांताराम दगडू जंगम (वय ६८, रा. पाचगणी) आणि विरोधक भारती राजेंद्र आंब्राळे, ओंकार राजेंद्र आंब्राळे व अभिषेक राजेंद्र आंब्राळे हे शेजारी-शेजारी राहतात. जंगम कुटुंबाचा ‘डंक’ असलेली खोली ही १९९० सालापासून त्यांच्या ताब्यात आहे. मात्र, या खोलीचा काही भाग आमच्या जागेत येत असल्याचा दावा विरोधक गेल्या काही दिवसांपासून करत होते.

​दिनांक १४ एप्रिल रोजी सकाळी ९:३० च्या सुमारास, विरोधकांनी आपसात संगनमत करून मजूर आणि कामगारांच्या सहाय्याने डंक असलेल्या खोलीवर कारवाई सुरू केली. शांताराम जंगम यांनी ‘ही खोली जुनी आहे, ती तुम्ही पाडू शकत नाही’ अशी विनंती केली असता, विरोधकांनी त्यांना जुमानले नाही. उलट, मजुरांच्या मदतीने डंकाच्या खोलीच्या तिन्ही बाजूंच्या भिंती पाडून त्याचे अतोनात नुकसान केले.

  1. ​घटना घडताना जेव्हा शांताराम जंगम आणि साक्षीदार विकास जंगम यांनी विरोधकांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली आणि दमदाटी करून तिथून हाकलून देण्यात आले.

​ या घटनेनंतर पीडित शांताराम जंगम यांनी तातडीने पाचगणी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत आरोपींविरुद्ध BNS ३२४(४), ३५२, ३५१(२)(३) आणि ३(५) अन्वये अदखलपात्र अहवाल क्रमांक ८८/२०२६ नुसार नोंद केली आहे. या प्रकरणाची पुढील कार्यवाही सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार इम्रान मुलाणी करत असून, फिर्यादींना योग्य त्या न्यायालयातून दाद मागण्याची समज देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

Panchgani news : शेतकऱ्यांनो, सातबाऱ्यावरील चुका आता चुटकीसरशी होणार दुरुस्त; महाबळेश्वर तालुक्यात विशेष ‘महाराजस्व...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​महाबळेश्वर : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाच्या नवीन धोरणानुसार, 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियानाचा टप्पा आता महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या उत्साहात...

error: Content is protected !!