HomeपांचगणीPanchgani news:अखेर शिक्कामोर्तब! पाचगणी नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचा (अजित पवार गट) दिलीप भाऊ बगाडे...

Panchgani news:अखेर शिक्कामोर्तब! पाचगणी नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचा (अजित पवार गट) दिलीप भाऊ बगाडे यांना पाठिंबा, ; बगाडेंच्या विरोधात कऱ्हाडकर कोणाला मैदानात उतरवणार?

पाचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : पाचगणी नगरपालिकेच्या आगामी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) आपला उमेदवार निश्चित केला आहे. पक्षाने माजी उपनगराध्यक्ष दिलीप भाऊ बगाडे यांच्या उमेदवारीवर विश्वास दर्शवला असून, आघाडीचा पाठिंबा त्यांना जाहीर करण्यात आला आहे.
यंदाच्या निवडणुकीत पाचगणी पालिकेला इतिहासात पहिल्यांदाच अनुसूचित जाती (SC) आरक्षण लाभल्यामुळे नगराध्यक्षपदासाठी मोठी चुरस निर्माण झाली होती. अनेक इच्छुकांनी नगराध्यक्षपदासाठी मैदानात उड्या घेतल्यामुळे पक्षासमोर उमेदवार निवडण्याचे मोठे आव्हान होते.

याबाबत पक्षाचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू असतानाही प्रमुख पक्षांकडून उमेदवारी ठरत नव्हती. राष्ट्रवादीकडून मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी स्वतः लक्ष घालून नगराध्यक्ष व नगरसेवापदाच्या सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यामुळे नाराजांची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र प्रभागातील काही इच्छुकांनी पक्षाचे आदेश मानून आपल्या उमेदवारी मागे घेतल्या मात्र नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी दिलीप भाऊ बगाडे यांना पाठिंबा दिला.

निवडणूक जाहीर झाल्यापासून दिलीप भाऊ बगाडे हे राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाले होते. त्यांची उठ बस वाढली होती. त्यामुळे राष्ट्रवादीचा पाठिंबा त्यांनाच मिळणार, असा अंदाज होता. अखेर, राष्ट्रवादी आघाडीचा पाठिंबा दिलीप भाऊ बगाडे यांनाच मिळाला असल्याची माहिती आघाडीचे नेते शेखर दादा कासुर्डे यांनी दिली आहे.

काल (मंगळवारी) सायंकाळी दिलीप भाऊ बगाडे यांनी मंत्री मकरंद आबा पाटील यांची भेट घेतली. यावेळी ना. पाटील यांनी बगाडे यांचे स्वागत करून त्यांना पुढील निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.

एका बाजूने नगराध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित झाला असताना, विरोधी आघाडीतून कोण मैदानात उतरणार, याची चर्चा आता पाचगणीच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
दरम्यान, माजी नगराध्यक्ष लक्ष्मीताई कऱ्हाडकर यांनी अद्यापही आपला नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे दिलीप भाऊ बगाडे यांच्या विरोधात कऱ्हाडकर गट कुठल्या उमेदवाराला पाठिंबा देणार, याकडे पाचगणीकरांचे लक्ष लागले आहे. त्यांनीसुद्धा इच्छुकांची चाचपणी सुरू केली असून, त्यांचा विश्वास कुणावर असेल हे पाहणे या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. यावरच नगराध्यक्ष पदाची निवडणूक रंगणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ;...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'तुमच्या घराचा...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

error: Content is protected !!