HomeपांचगणीPanchgani news : आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर पाचगणी शहरात पोलिसांचा संचलन; शांततेत सण...

Panchgani news : आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर पाचगणी शहरात पोलिसांचा संचलन; शांततेत सण साजरा करण्याचे ‘खाकी’चे आवाहन

पांचगणी न्यूज नेटवर्क 

पांचगणी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पाचगणी शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सुरक्षिततेची जाणीव करून देण्यासाठी पाचगणी पोलीस ठाण्याच्या वतीने सोमवारी सायंकाळी भव्य रूट मार्च (संचलन) काढण्यात आला. सायंकाळी ६:१० च्या सुमारास जुन्या पोलीस ठाण्यापासून या संचलनाला सुरुवात झाली. यावेळी संपूर्ण पाचगणी शहर ‘खाकी’च्या पदरावाजासह शिस्तबद्ध संचलनाने गजबजून गेले होते.

​हा रूट मार्च जुने पोलीस स्टेशन येथून मार्गस्थ होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक, जामा मज्जिद परिसर, राहिल प्लाझा आणि एसटी स्टँड मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक व जुन्या पोलीस स्टेशनवर विसर्जित करण्यात आला. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि चोख नियोजनात पार पडलेल्या या संचलनामध्ये १ पोलीस अधिकारी, १४ पोलीस अंमलदार, ६ एमएसएफ जवान, आरसीपीचे १ विशेष पथक आणि १४ होमगार्ड अशा मोठ्या फौजफाट्याचा सहभाग होता. या संचलनामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, संभाव्य अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी दिसून आले.

​पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली हे संचलन अत्यंत प्रभावीपणे पार पडले. संचलनाच्या सांगतेवेळी दिलीप पवार यांनी शहरातील नागरिक आणि जयंती उत्सव मंडळांना महत्त्वपूर्ण आवाहन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार शांतता आणि बंधुभाव जोपासणारे आहेत, त्यामुळे त्यांची जयंती साजरी करताना कुठेही गालबोट लागणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असे त्यांनी नमूद केले. नियमांचे पालन करून आणि सामाजिक सलोखा राखून भीमजयंतीचा उत्साह द्विगुणित करावा, असे आवाहन करतानाच पोलिसांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या. शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलीस प्रशासनाचे संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

Panchgani news : शेतकऱ्यांनो, सातबाऱ्यावरील चुका आता चुटकीसरशी होणार दुरुस्त; महाबळेश्वर तालुक्यात विशेष ‘महाराजस्व...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​महाबळेश्वर : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाच्या नवीन धोरणानुसार, 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियानाचा टप्पा आता महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या उत्साहात...

error: Content is protected !!