HomeपांचगणीPanchgani news : दत्तात्रय कळंबे महाराज पतसंस्थेच्या संचालक पदी भरत रांजणे यांची...

Panchgani news : दत्तात्रय कळंबे महाराज पतसंस्थेच्या संचालक पदी भरत रांजणे यांची बिनविरोध निवड : स्व तुकाराम घाडगे भाऊ यांना अभिप्रेत काम करणार : रांजणे

पांचगणी न्यूज नेटवर्क 

पांचगणी : दापवडी (ता. जावली) येथील कै. दत्तात्रय कळंबे महाराज नागरी सहकारी पतसंस्था काटवलीच्या रिक्त झालेल्या संचालक पदावर आज भरत आत्माराम रांजणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल रांजणे यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

संस्थेचे ज्येष्ठ संचालक आणि माजी चेअरमन तुकाराम रामचंद्र घाडगे यांचे नुकटेच निधन झाले. त्यांचे झालेल्या रिक्त जागेवर आज नव्या संचालकांच्या निवडीसाठी आज संस्थेच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अक्षय चव्हाण अध्याशी अधिकारी तथा कनिष्ठ लिपिक अधीन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मेढा हे होते तर सभेच्या अध्यक्ष स्थानी चेअरमन रविकांत बेलोशे हे होते तर यावेळी व्हा चेअरमन हरिश्चंद्र गावडे, संचालक बाबुराव रांजणे, प्रकाश रांजणे , मधुकर पवार, भीमराव खरात, रामचंद्र बेलोशे, रामदास रांजणे, व्यवस्थापक अनिल रांजणे आदी उपस्थित होते.

रिक्त झालेल्या जागेसाठी विहित वेळेत भरत रांजणे यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने भरत रांजणे यांची या पदावर बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय चव्हाण यांनी जाहीर केले. या निवडी नंतर भरत रांजणे यांचा अक्षय चव्हाण यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. तर रविकांत बेलोशे यांचे हस्ते अक्षय चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. निवडीनंतर नवनिर्वाचित संचालक भरत रांजणे यांनी सांगितले स्व तुकाराम घाडगे यांच्या जागेवर माझी निवड होणे हे मी माझे भाग्य समजतो. संस्थेसाठी भाऊनी दिलेले योगदान लाखामोलाचे आहे. तुकाराम घाडगे यांचे प्रमाणेच मी माझ्या कामाची दिशा संस्थेच्या प्रगती साठी जास्तीत जास्त देणार असल्याची ग्वाही दिली.

बाबुराव रांजणे यांनी स्वागत केले यावेळी सरपंच महादेव रांजणे, माजी सरपंच संतोष रांजणे, बापूराव रांजणे गुरुजी, काळू पाटील तसेच करहर शाखा प्रमुख शंकर गोळे, पांचगणी शाखा प्रमुख प्रकाश रांजणे, भोसे शाखा प्रमुख लक्ष्मण ओंबळे, वसुली अधिकारी अजित बेलोशे, शामराव रांजणे,रामदास गलगले, श्रीमती सुनीता राजपुरे आदी उपास्थित होते.

या निवडीबद्दल भरत रांजणे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. रविकांत बेलोशे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ;...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'तुमच्या घराचा...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

error: Content is protected !!