HomeपांचगणीPanchgani news: मॅप्रो-कप बास्केटबॉल स्पर्धेत न्यू इराचा 'दणका'! शानबागवर १६ गुणांनी मात...

Panchgani news: मॅप्रो-कप बास्केटबॉल स्पर्धेत न्यू इराचा ‘दणका’! शानबागवर १६ गुणांनी मात करत विजेतेपद पटकावले

पाचगणी न्यूज नेटवर्क ।

पांचगणी: सेंट झेविअर्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, पांचगणी यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘मॅप्रो-कप आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धे’ मध्ये पांचगणीच्या न्यू-इरा हायस्कूल संघाने चमकदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. अंतिम सामन्यात त्यांनी सातारा येथील शानबाग स्कूल संघाचा ३३-१७ अशा १६ गुणांच्या मोठ्या फरकाने दणदणीत पराभव केला.

​सेंट झेविअर्स हायस्कूलच्या भव्य मैदानावर या आंतरशालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला मॅप्रो फूड्स प्रा. लि. यांचे विशेष सौजन्य लाभले. या स्पर्धेत पांचगणी, सातारा, लोणंद आणि सोलापूर अशा विविध शहरांमधील एकूण आठ संघांनी सहभाग घेतला होता. बास्केटबॉल असोसिएशन, सातारा यांच्या अनुभवी पंचांच्या उपस्थितीत सर्व सामने अत्यंत उत्साहात पार पडले.

​अंतिम सामना अत्यंत रोमांचक ठरला, ज्यात न्यू-इरा हायस्कूलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट समन्वय आणि वेगवान खेळाचे प्रदर्शन करत शानबाग स्कूलला कोणतीही संधी दिली नाही. त्यांनी ३३-१७ गुणांनी मात करत संपूर्ण स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवला. या पराभवामुळे साताऱ्याचे शानबाग हायस्कूल उपविजेते ठरले, तर पांचगणी येथील सेंट पीटर्स हायस्कूल संघाने तिसरे स्थान पटकावले.

​पुरस्कार वितरण समारंभ सेंट झेविअर्स हायस्कूलचे संचालक फादर टॉमी, मुख्याध्यापक फादर साबू व फादर जिंटो यांच्या हस्ते पार पडला. यावेळी विजेत्या संघांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.

​समारोप प्रसंगी बोलताना संचालक फादर टॉमी म्हणाले की, “खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवा अनुभव मिळावा यासाठी ही मॅप्रो-कप बास्केटबॉल स्पर्धा सेंट झेविअर्स हायस्कूलच्या वतीने यापुढे दरवर्षी आयोजित केली जाईल. विविध जिल्ह्यांतील शाळांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.” यावेळी सर्व सहभागी संघांचे प्रशिक्षक आणि खेळाडूंचे विशेष अभिनंदन करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Panchgani news : आंब्रळ येथे जागेच्या वादातून ‘डंक’ असणाऱ्या रूमची भिंत पाडली ;...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील मौजे आंब्रळ येथे जागेच्या वादातून मिरची कांडप करणाऱ्या डंकाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. 'तुमच्या घराचा...

Panchgani news : पाचगणीत उद्या निघणार शिवरायांची शाही मिरवणूक; पर्यटननगरीत अवतरणार ‘शिवसृष्टी’शिवभक्त एकवटणार

पांचगणी न्यूज नेटवर्क पाचगणी: सह्याद्रीच्या कुशीत वसलेली पर्यटननगरी पाचगणी उद्या 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणांनी दुमदुमून...

Panchgani news : पाचगणीतील भरत मालुसरे सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार; पाचगणी पोलिसांची धडक...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पाचगणी: पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे याच्यावर सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने तडीपारीची मोठी कारवाई...

Panchgani news : पाचगणीत मोबाईल नेटवर्कचा ‘टॉवर’ कोमात ; पर्यटकांसह स्थानिक नागरिक वारंवार होताहेत...

पांचगणी न्यूज नेटवर्क ​पाचगणी : सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि पर्यटकांचे नंदनवन समजले जाणारे पाचगणी सध्या 'डिजिटल अंधारात' चाचपडत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील मोबाईल...

Panchgani news : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘बालविवाहा’चा घाट घातल्यास खैर नाही; महाबळेश्वर प्रशासन ॲक्शन...

पांचगणी न्यूज नेटवर्क  ​पांचगणी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वत्र लग्नांची लगबग असते. मात्र, याच शुभ मुहूर्ताचा गैरफायदा घेत कायद्याने प्रतिबंधित असलेले...

error: Content is protected !!