पांचगणी न्यूज नेटवर्क
वाई : वाई येथील विप्रल (अवधूत ) विजय बोन्द्रे यांची भाभा अणू संशोधन केंद्र येथे सायंटिस्ट ऑफिसर म्हणून निवड झाली आहे. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. समाजाच्या वतीने त्यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला.
विप्रल हा प्रदीप शिंदे यांचा भाचा असून त्याने बिकट परस्थिती असून देखील अभूतपूर्व असे यश मिळविले याचा सर्व समाजबांधवांना अभिमान वाटतो. ९०० विद्यार्थ्यांमधून विप्रलची निवड झाली आहे. विप्रलचे मामा प्रदीप शिंदे हे वडापावचा व्यवसाय करीत असून त्यांनी विप्रलचे लहानपणा पासून संगोपन करून त्याचे शिक्षण पूर्ण केले. त्यास आई.आजी.मामा मामी यांचे खूप सहकार्य लाभले.
या यशाबद्दल विप्रल उर्फ अवधूतचा भोई समाजाच्या वतीने वाई येथे भव्य सत्कार केला. यावेळी गजानन शिंदे, प्रदीप शिंदे, माणिक गुजर, तुषार चक्के, घनश्याम चक्के, किरण गुजर, उमेश गुजर, महेंद्र धनवे, श्रीकांत वाघ, चंद्रकांत भोई , प्रकाश ढगे, नंदकुमार ढगे, सुभाष वंजारी, संपत वंजारी,दीपक वंजारी ,सुनील गुजर, दिलीप करंजे, धनंजय वंजारी, चंद्रकांत गुजर, जितेंद्र चक्के आदी उपस्थित होते.
समाजबांधवांनी केलेला हा सत्कार मी कदापीही विसरणार नसून यातून नवी प्रेरणा घेऊन मी आपल्या आयुष्याची पुढे वाटचाल ठेवणार आहे. असे यावेळी सत्काराला उत्तर देताना विप्रल बोंद्रे यांनी व्यक्त केले.
























