पांचगणी न्यूज नेटवर्क
भिलार,: सातारा बँक जिल्ह्यातील शेतकरी व नवउद्योजकांना केंद्रबिंदू मानून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. बदलत्या काळानुसार बँकेने विविध कर्ज धोरणात सुधारणा करून नवनविन कर्ज धोरणांची आखणी केली आहे. माफक व्याजदरात शासनाच्या अनुदान प्राप्त व व्याज परतावा प्राप्त योजना बँकेने कार्यान्वीत केलेल्या आहेत. त्याचा लाभ सर्व समाजघटकांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांनी केले.
भिलार (तालुका महाबळेश्वर) येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेचे वतीने नवीन वाहन कर्ज योजनेमधून तानाजी चोरमले यांना XL 6 गाडीचे वितरण करताना बँकेचे संचालक मा राजेंद्रशेठ राजपुरे बोलत होते. यावेळी नियोजन कमिटी सदस्य प्रवीण भिलारे, शशिकांत भिलारे, गणपतशेठ पार्टे, सरपंच शिवाजी भिलारे, शांताराम भिलारे, संजय भिलारे , सुभाष भिलारे, संतोष मोरे, सखाराम चोरमले, प्रशांत भिलारे, सुरेश भिलारे बँकेचे विभागीय विकास अधिकारी राजेंद्र निकम आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजपुरे पुढे म्हणाले बँक अनेकविध व्यवसायांसाठी कर्जपुरवठा करत असून यामध्ये मराठा समाजातील उद्योजकांना आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनेतून शून्य टक्के दराने कर्ज पुरवठा करत आहे याचा युवकांनी लाभ घ्यावा
विभागीय विकास अधिकारी राजेंद्र निकम म्हणाले जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, व्यवसायीक व उद्योजकांच्या आर्थिक उन्नतीसाठी बँक कटीबध्द आहे. बँकेच्या विविध योजनांमध्ये स्ट्रॉबेरी लागवड, शेती कर्ज , व्यवसायासाठी कॅश क्रेडीट कर्ज,वाहन कर्ज, गृहबांधणीसाठी गृहसंकल्पपूर्ती कर्ज योजना अशा विविध योजनाचा लाभ ग्राहकांनी घ्यावा.
याप्रसंगी बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांचे हस्ते गाडी वितरण करण्यात आली. यावेळी शाखाप्रमुख रामभाऊ मालुसरे व शाखेतील सेवक नरेंद्र कळंबे कल्पेश आंब्राळे, प्रताप धनावडे, अमित दुधाने व ग्रामस्थ उपस्थित होते.
























