
पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : गेली वर्षभरात पांचगणी पोलिसांनी दमदार कामगिरी केली असून पर्यटन स्थळ असणाऱ्या पांचगणी पोलिस ठाण्याने विविध गुन्ह्यातील आरोपी अटक, ऑनलाईन फ्रॉड गुन्हे तसेच चोरी गेलेले मोबाईल, मोटार सायकल हे गुन्हे उघडकीस आणून लाखो रुपयांचा ऐवज मिळवून देण्याबरोबरच आगामी निवडणूक लक्षात घेता तडीपारीचे प्रस्ताव पाठविले असल्याची माहिती पांचगणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली आहे.
पांचगणी पोलीस ठाणे हद्दीत चोरीला गेलेल्या २२ मोबाईलचा सुमारे एकुण ४,४०,०००/- रुपये किमतीचा ऐवज. सिद्ध घेत तांत्रिक माहीतीच्या आधारे पोलीस ठाणे हद्दीतील परीसर व आजुबाजुचे पोलीस ठाणे हद्दीतील गावातुन तसेच इतर जिल्ह्यातून शोध घेवुन ते प्राप्त करण्यास गुन्हे प्रकटीकरण पथकास यश प्राप्त झाले. आत्तापर्यंत मागील 1 वर्षात 70 मोबाईलचा शोध घेवुन ते नागरीकांना परत करणेत आले आहेत.
ऑनलाईन फ्रॉड द्वारे गेलेली रक्कम परत करताना पाचगणी पोलीस ठाणे हद्दीतील सायबर गुन्हयास बळी पडलेल्या नागरीकांची फसवणुक रक्कम परत मिळवुन देण्याकरीता विशेष प्रयत्न करुन एकुण 3,70,000/- रुपये संबंधीत नागरीकांना परत मिळवुन दिलेली आहे. वाहतुकीचे नियम मोडणारे यांचेवर 29 केसेस केलेल्या आहेत. तसेच इतरच्या दंडात्मक 1030 केसेसमध्ये 8,80,350/- दंड करणेत आलेल्या आहेत.
उघडयावर दारु पिणा-या इसमांविरुध्द चालु वर्षात 2025 मध्ये एकुण 18 केसेस करुन कायदेशिर कारवाई केलेली आहे. दारु पिवुन वाहण चालवणा-यांविरुध्द 11 केसेस केलेल्या आहेत. तसेच एनडीपीएस कायदया अंतर्गत 10 कारवाई करणेत आलेल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परीषद, नगरपरीषद, नगरपालीका निवडणुकीसाठी पांचगणी पोलीस सुसज्ज झाले असुन यात 74 जणांवर प्रतिबंधक कारवाई करणेत आलेल्या आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, उपविभागिय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचीम यांचे मार्गदर्शनाखाली पांचगणी पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार व गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस अधिकारी बालाजी सोनुने पोलीस अंमलदार श्रीकांत यदु कांबळे, महीला पोलीस हवालदार रेखा तांबे , पोलीस कॉन्स्टेबल उमेश लोखंडे व पोलीस कॉन्स्टेबल अमोल जगताप यांनी सहभाग घेतला.
100 दिवसांची कार्यालयीन सुधारणांचे विशेष मोहीमे अंतर्गत पोलीस अंमलदार यांचे करीता सुसज्ज असे स्वतंत्र बैठक व्यवस्था, पोलीस स्टेशनमध्ये सुव्यवस्थित नामफलक लावणेत आलेले आहेत, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय, आपले सरकार पोर्टल वरील तक्रारींचे तात्काळ निराकरण, अभ्यागत भेटीचे नियोजन व भेटीचे वेळेबाबत प्रसिध्दी, निर्भया पथक नेमणूक त्यांचे द्वारे शाळांना भेटी, तसेच बदलापुर येथे घडलेल्या अनुचीत प्रकार पांचगणी येथे घडु नये म्हणुन सर्व शाळेतील शिक्षक व शिक्षेकतर स्टाफ यांची विषेश चारीत्र्य पडताळणी मोहीम राबवली.
























