
पांचगणी न्यूज नेटवर्क/ प्रशांत थोरवे
वाई, दि. 30 – वाईतील बांधकाम व्यावसायिक श्री. सुनील संकपाळ यांना देशपातळीवरील उत्कृष्ठ मुल्यांकनकर्ते पुरस्कार मिळाल्याबद्दल दि वाई अर्बन को. आँप. बँकेच्यावतीने बँकेचे अध्यक्ष श्री. अनिल देव, उपाध्यक्ष डाँ. शेखर कांबळे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
अध्यक्ष श्री. अनिल देव म्हणाले, सुनील संकपाळ हे वाईतील ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे बांधकाम दर्जा तपासणी राष्ट्रीयस्तर मान्यताप्राप्त प्रयोगशाळा आहे. बांधकाम क्षेत्रात विविध प्रयोग करून श्री. संकपाळ यांनी आपला नावलौकीक निर्माण केला आहे. या क्षेत्रातील उत्कृष्ठ योगदानामुळे त्यांना इंडीयन इंस्टीट्यूट आँफ व्हॅल्युएअर्स या संघटनेतर्फे मोस्ट इंपॅक्ट व्हॅल्युएर हा पुरस्कार मिळाला आहे, ही वाईकरांच्यादृष्टीने अभिमानाची बाब आहे.
उपाध्यक्ष डाँ. शेखर कांबळे यांनीही सुनील संकपाळ यांच्या कार्याचा गौरव केला.
























