
पांचगणी न्यूज नेटवर्क
तापोळा : गोगवे (तालुका महाबळेश्वर ) येथील सोळशी विभाग विकास कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी संतोष मोरे तर व्हा. चेअरमनपदी सखाराम संकपाळ यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर नवनिर्वाचित चेअरमन , व्हा. चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला. या बद्दल नवनिर्वाचित चेअरमन व व्हा. चेअरमन यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
सोळशी विभाग विकास कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी. गोगवे या संस्थेची संचालक मंडळाची निवडणूक सन २०२५ ते २०३० साठी बिनविरोध पार पाडली. संस्थेच्या चेअरमन पदासाठी आज संस्थेच्या कार्यालयात विशेष सभा बोलावण्यात आली होती. यावेळी चेअरमन व व्हा. चेअरमन पदासाठी एक, एकच अर्ज दाखल झाल्याने दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले.
या निवडीनंतर महाबळेश्वर तालुक्याचे माजी सभापती संजय (बाबा) गायकवाड म्हणाले, महायुतीचे धोरण स्वीकारुन संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्यात यशस्वी झालो आणि पुढच्या पिढीला एक आदर्श निर्माण करुन ठेवला आहे. तो नविन संचालक मंडळाने तशा पद्धतीने कारभार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक बाबुराव दादा संकपाळ म्हणाले नवीन संचालक मंडळाने आपला स्वच्छ कारभार करुन संस्थेला अजून नावारुपाला भरभराटीला आणून सर्व सभासदांना न्याय मिळवून द्यावा व नवनविन योजना राबवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी संचालक संजय गायकवाड, दत्ताराम कदम, सोमाजी भोसले, पांडुरंग जाधव,विठ्ठल शिंदे, गणेश संकपाळ, गणपत कदम, आंनदा सांवत, सावित्री जाधव, लिलाबाई जाधव उपस्थित होते.
या निवडीबद्दल नवनिर्वाचित चेअरमन संतोष मोरे व व्हा. चेअरमन सखाराम संकपाळ यांचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा पाटील , जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, माजी सभापती संजय (बाबा) गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव दादा संकपाळ, धोंडीबा जंगम, जावळी बँकेचे माजी संचालक सुभाषशेठ कदम , १०५ गाव समन्वय् समिती प्रमुख वसंतशेठ शिंदे , जावली बँकेचे संचालक गणेश भोसले, शिक्षक बँक संचालक संजय संकपाळ (गुरुजी) आदी मान्यवरांनी निवडीबद्दल अभिनंदन केले.
























