पांचगणी न्यूज नेटवर्क /प्रशांत थोरवे
वाई : इंडीया तायक्वांदोच्यावतीने नाशिक येथे घेण्यात आलेल्या सेकंड किड्स चॅम्पियन ऑफ चॅम्पियन २०२५ च्या नॅशनल तायक्वांदो स्पर्धेमध्ये
भिलार येथील श्रवण अमोल रांजणे या खेळाडूने तायक्वांदो या खेळ प्रकारात अलौकिक कसब दाखवून महाबळेश्वर तालुक्याला प्रथमच सुवर्ण पदक मिळवून तालुक्याच्या सन्मानात भर पाडली .
सदर खेळाडू हा पुस्तकाचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिलार या गावचाआहे. तो विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा भिलार या शाळेचा विद्यार्थी आहे.
सातारा व पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये ब्लॅक ड्रॅगन स्पोर्ट्स अकॅडमी चे विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.
ब्लॅक ड्रॅगन स्पोर्ट्स अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष विशाल कुमठे सर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्तरापर्यंत अनेक खेळाडू पोहोचले आहेत.
श्रवण हा ब्लॅक ड्रॅगन तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये तायक्वांदो प्रशिक्षण घेत असलेला खेळाडू आहे.
श्रवणला प्रशिक्षक म्हणून संस्थापक अध्यक्ष विशाल कुमठे सर,सहकारी प्रशिक्षक प्रेमजीत चव्हाण, विष्णू खोत हे लाभले आहेत.
श्रवणच्या कौतुकास्पद कामगिरी बद्दल गटविकास अधिकारी यशवंत भांड साहेब, पंचायत समिती महाबळेश्वर, गटविकास अधिकारी आनंद पळसे साहेब,विस्ताराधिकारी सुरेंद्र भिलारे तसेच महाबळेश्वर पंचायत समितीचे कर्मचारी यांनी पंचायत समिती महाबळेश्वर येथे श्रवण याचा सन्मान करून त्यांचे कौतुक व सुयश चिंतले.
या कार्यक्रमास महाबळेश्वर पंचायत समितीचे सर्व कर्मचारी,ब्लॅक ड्रॅगन स्पोर्ट्स अकॅडमी चे संस्थापक अध्यक्ष विशाल कुमठे सर,प्रशिक्षक प्रेमजीत चव्हाण, विष्णू खोत, सुवर्णाताई रांजणे व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. सर्वांनीच श्रवण रांजणे या खेळाडूचे तोंड भरून कौतुक करून त्यास पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
























