पांचगणी न्यूज नेटवर्क
पांचगणी : पाचगणी – काटवली घाटात आज दुपारी अडीच वाजण्याचे सुमारास शिंदेवाडी गावाजवळ एक वृक्ष रस्त्यात कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली.
याबाबत अधिक माहिती अशी की पाचगणी काटवली घाटात सध्या पावसाचा जोर असून आज दुपारी अडीच वाजण्याचे सुमारास शिंदेवाडी गावाजवळ असणाऱ्या कुसुमांजली इस्टेट जवळ रस्त्याच्या डोंगर बाजूला असणारे. भले मोठे जांभळीचे मोठे झाड रस्त्यावर कोसळले. व झाड रस्त्याच्या मधोमध कोसळल्याने पांचगणी व करहर बाजूकडे दोन्ही बाजूला जाणारी वाहतूक थांबली.
























